वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा

Raid on a prostitute's lodge in Ghunki
Raid on a prostitute's lodge in Ghunki

पेठवडगाव (कोल्हापूर) : घुणकी (ता. हातकणंगले) येथील एका लॉजवर वेश्‍या व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी छापा टाकला. यात दोन पीडित तरुणींसह पाच जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या प्रकरणी लॉजचालक प्रकाश अशोक खंडागळे (मालेवाडी, ता. वाळवा, जि. सांगली), व्यवस्थापक शैलेश मनोहर देसाई (मूळ गाव अवंतीनगर, सोलापूर) व दोन एजंट विकास कावडे (अंबप फाटा, ता. हातकणंगले), प्रदीप साहेबराव जाधव (बोरिवडे, ता. पन्हाळा) याच्यासह धीरज जीवन टोपगे (नागाव, ता. हातकणंगले) अशी दाखल झालेल्यांची नावे आहेत.

घुणकीजवळ राष्ट्रीय महामार्गाजवळ असणाऱ्या शेतात हराळे रिसॉर्ट नावाचे लॉजिंग आहे. तेथे संगनमताने वेश्‍या व्यवसाय करीत असल्याची माहिती कोल्हापूर पोलिस पथकांस मिळाली होती. त्यानुसार पथकाने छापा टाकला. यात दोन महिलांसह चार जणांवर गुन्हा नोंद केला. या कारवाईत नोंदवही, तीन मोबाईल, दोन मोटारसायकलसह तीन हजार रोकड असा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेच्या समाजसेवी विभागाच्या वतीने करण्यात आली. याबाबत पेठवडगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com