Video : साताऱ्यातील विजयानंतर श्रीनिवास पाटील पवारांच्या भेटीला!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 25 October 2019

दिवाळीनिमित्त शरद पवार यांचा मुक्काम बारामतीत असून आज शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना बारामतीत बोलावून घेतले होते.

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सातारचे नवनिर्वाचित खासदार श्रीनिवास पाटील यांनी शुक्रवारी (ता.25) सायंकाळी बारामतीत ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली.

यावेळी शरद पवार यांनी खासदार पदी निवडून आल्याबद्दल श्रीनिवास पाटील यांचा सत्कार केला. तसेच श्रीनिवास पाटील यांनी देखील शरद पवार यांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

- ...तर आघाडीच्या आणखी चार जागा वाढल्या असत्या

या सत्कार समारंभानंतर श्रीनिवास पाटील आणि शरद पवार या दोघांच्या निवांत गप्पा झाल्या. त्यानंतर श्रीनिवास पाटील आणि शरद पवार हे एकाच गाडीतून पवार यांच्या बारामतीतील 'गोविंदबाग' या निवासस्थानाकडे रवाना झाले. दिवाळीनिमित्त शरद पवार यांचा मुक्काम बारामतीत असून आज शरद पवार यांनी श्रीनिवास पाटील यांना बारामतीत बोलावून घेतले होते.

- मराठी चित्रपटांची दिवाळी भेट, 'हे' आहेत पर्याय !

विद्या नगरीतील व्हीआयआयटीमध्ये शरद पवार आणि श्रीनिवास पाटील यांचा गप्पांचा फड रंगला. यावेळी पुरंदरचे नवनिर्वाचित आमदार संजय जगताप हेदेखील त्याठिकाणी उपस्थित होते. यानिमित्ताने अनेक जुन्या आठवणींना या सर्व जुन्या मित्रांनी उजाळा दिला. 

हास्यविनोदात रंगले सवंगडी

विधानसभा आणि सातारा लोकसभेची पोटनिवडणूक या धामधूमीतून सध्या थोडा वेळ मिळालेले हे दोन मित्र हास्यविनोदात रंगले. लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाचा आनंद आणि श्रीनिवास पाटील यांच्या नर्मविनोदी शैलीतील संभाषणामुळे या ठिकाणचे वातावरण प्रफुल्लित झाले होते.

- मंत्रिमंडळात शिवसेना देणार नवे चेहरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Srinivas Patil meets sharad Pawar in Baramati after victory in Satara Lok Sabha election