दहावी-बारावी परीक्षेच्या कामात हलगर्जीपणा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

केंद्र संचालकांची यादी देण्यास टाळाटाळ; शाळांना नोटिसा
सोलापूर - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षेस केंद्र संचालकांची यादी देण्यास शाळांना सांगितले होते. मात्र, दोन महिन्यांनंतरही शाळांनी ही यादी शिक्षणाधिकाऱ्यांकडे दिलेली नाही. परीक्षेच्या कामासंदर्भात दुर्लक्ष व हलगर्जीपणा करणाऱ्या शाळांना माध्यमिकचे शिक्षणाधिकारी सत्यवान सोनवणे यांनी कारणे दाखवा नोटिसा दिल्या आहेत.

शिक्षणाधिकाऱ्यांनी दोन महिन्यांपूर्वी शाळांना केंद्र संचालकांची यादी देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्यानंतर 19 डिसेंबरला दुपारी दोन वाजेपर्यंत ही यादी सादर करण्यास सांगितले होते. मात्र, तरीही शाळांनी शिक्षणाधिकाऱ्यांच्या पत्राला केराची टोपली दाखविली आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना "कारणे दाखवा' नोटिसा बजावल्या आहेत. या याद्या का दिल्या नाहीत, याचा खुलासा शाळांना करावा लागणार आहे.

गोपनीय अभिलेखात प्रतिकूल शेरा
परीक्षेच्याबाबतीत मुख्याध्यापक गंभीर नाहीत. त्यामुळे त्यांच्या संस्था अध्यक्ष व सचिवांना कळवून गोपनीय अभिलेखामध्ये प्रतिकूल शेरा का मारू नये? याचाही खुलासा करण्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे. याशिवाय 24 तासांच्या आत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

Web Title: SSC-HSC examination default work