Marathi Rajbhasha Din : एसटी दररोज शब्दांचीही वाहतूक करते

ST also transports words daily
ST also transports words daily

नगर : एसटीचे चालक-वाहक प्रवाशांची वाहतूकच करीत नाहीत, तर ते भाषा व शब्दांचीही वाहतूक करीत असतात. रोजच्या कामामुळे त्यांच्याकडून अशी भाषेची सेवा घडत असते. दररोज दर कोसावर नवीन प्रकारची माणसं एसटी बसत असतात. त्यांच्या मुखातून निघणारी भाषाही अलग अलग असते. वाहक आणि चालक हे त्याचे सूत्रसंचालक असतात. खरे तर मराठी भाषेचा हा प्रवासच असतो.

कवी कुसुमाग्रज जन्मदिन व मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त एसटी महामंडळाच्या तारकपूर आगारात आयोजित कार्यक्रमात राधाबाई काळे महिला महाविद्यालयाचे प्रा. दशरथ काळे यांनी केले. 

अध्यक्षस्थानी विभागनियंत्रक विजय गिते होते. वाहतूक अधीक्षक दादासाहेब महाजन, कामगार अधिकारी सचिन भुजबळ, विभागीय भांडार अधिकारी नितीन आढाव, आगार व्यवस्थापक अविनाश कल्हापुरे, राजेश खराडे आदी उपस्थित होते. 

प्रा. काळे म्हणाले, ""चंद्र व सूर्य असेपर्यंत मराठी भाषा टिकणार आहे. परकीय भाषेच्या अतिक्रमणामुळे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे. प्रत्येकाने आपल्या मुलांना मराठी शाळेत शिकविणे गरजेचे आहे. आपल्या भाषेचे जतन करणे गरजेचे आहे. साहित्य प्रेरणादायी आहे. भाषेतील शब्दांचे ज्ञान असले, तर साहित्य समजते. पुस्तकी ज्ञानाने काही मिळत नाही. अनुभव जीवनात महत्त्वाचे असतात.'' सूत्रसंचालन किशोर पराते यांनी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com