एसटी पलटी... किंकाळ्‍यांनी चुकला हृदयाचा ठोका 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

एसटीत शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनीसह सुमारे 62 प्रवासी होते. त्यातील 13 प्रवासी महाबळेश्वरला जाणारे होते. अनेक प्रवाशी उभे राहूनच प्रवास करत होते. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजत आहे. यावेळी जोरजोरात आरडाओरडा झाली.

उंब्रज (ता. कऱ्हाड) : राष्ट्रीय महामार्गावर शिवडे येथील मांड नदीच्या पुलावर महाबळेश्वरकडे निघालेली एसटी पलटी होऊन अपघात झाला. एसटी मध्ये सुमारे 62 प्रवासी असून, त्यातील अनेकजण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या दुर्दैवी अपघातामुळे अनेक प्रवाशांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. 

हे वाचा : तीन दिवसांपुर्वीच ती शिक्षिका म्हणून रुजु झाली अन् आज...

कऱ्हाड बाजूकडून साताऱ्याच्या दिशेने निघालेल्या सांगली - महाबळेश्वर एसटी (एम. एच. 14 डीसी 490) येथील शिवडे नजीक मांड पुलावर आली. त्यावेळी एसटीच्या पुढील बाजूची धडी तुटल्यामुळे एसटी पलटी झाल्याचे सांगण्यात येते. एसटीत शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनीसह सुमारे 62 प्रवासी होते. त्यातील 13 प्रवासी महाबळेश्वरला जाणारे होते. 

हेही वाचा : मोकांतर्गत १५० गुन्हेगारांवर कारवाई

एसटीमध्ये गर्दी असल्याने अनेक प्रवाशी उभे राहून प्रवास करत होते. एसटी पलटी झाल्याने बहुतेक प्रवासी जखमी झाल्याचे समजते. जखमींची निश्‍चित संख्या समजू शकली नाही. जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ST Bus Accident At Karad Taluka