तीन दिवसांपुर्वीच 'ती' शिक्षिका म्हणून रुजु झाली अन् आज...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीमुळेच वेदा मुळे यांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

चिखली : दुचाकीवरून रस्ता ओलांडत असताना भरधाव मोटारीची धडक बसून झालेल्या अपघातात एका शिक्षिकेचा जागीच मृत्यू झाला तर एक शिक्षिका गंभीर जखमी झाली. ही घटना कुदळवाडी येथील रिव्हर रेसिडेन्सी परिसरात शनिवारी (ता. 11) सकाळी घडली. 

यात्रेला निघालेल्या बाप-लेकीवर काळाचा घाला; ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू 

वेदा दीपक मुळे (वय. 28) असे मृताचे नाव असून, जयश्री चौगुले (वय. 29 दोघी रा. डुडुळगाव ) या गंभीर जखमी झाल्या आहेत. मोटारचालक रविकांत कृष्णप्रसाद राजू (रा. रिव्हर रेसिडेन्सी) यांच्याविरोधात चिखली पोलिस गुन्हा दाखल झाला.

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांवर शिक्कामोर्तब; यांची निवड 

तीन दिवसांपुर्वीच 'ती' शिक्षिका म्हणून रुजु झाली अन् आज... 
मुळे व चौगुले या रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील एका शाळेत शिक्षिका होत्या. वेदा या तीनच दिवसांपूर्वीच येथे रुजू झाल्या होत्या. शाळेत जात असताना भरधाव मोटारीची त्यांना जोरदार धडक बसली. त्यात वेदा या गाडीवरून पडल्या. तर जयश्री यांच्या हाताचे व पायाचे हाड मोडले. मृत दीपा यांना दोन आणि चार वर्षांची मुले आहेत. 

संभाजीराजेंचे उपोषण मागे; सारथीची स्वायत्तता कायम राहणार (व्हिडिओ)
अतिक्रमणामुळे वेदाचा मृत्यू
रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रस्त्यांवर विक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीमुळेच वेदा मुळे यांचा बळी गेल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. शनिवारी नागरिकांनीच हातगाड्या पथारीवाले यांना पिटाळून लावले. तसेच दुकानदारांना पदपथावर व रस्त्यावर ठेवलेले सामान दुकानात घेण्यास भाग पाडले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Teacher dies due to hit by car in Chikhali pune