सांगली - एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sangli

सध्या संपामुळे चाके थांबली असून सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे.

सांगली - एसटी कर्मचाऱ्याचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

sakal_logo
By
अजित झळके

सांगली - कवलापूर (ता. मिरज) येथील एसटीचे कंडक्टर राजेंद्र एन. पाटील (वय ४२) यांचे आज अचानक हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते सांगली एसटी आगारात कार्यरत होते. सध्या एसटीचा संप असल्याने ते घरीच होते. तेथेच त्यांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

हेही वाचा: कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीबाबत खलबतं

राजेंद्र पाटील हे एसटीत वाहक म्हणून कार्यरत होते. गेले काही दिवस एसटीचे आंदोलन सुरु आहे. सध्या संपामुळे चाके थांबली आहेत. त्यातच सरकारने कारवाईचा इशारा दिला आहे. त्यामुळे अनेक कर्मचारी चिंतेत आहे. त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र पाटील हेही तणावात होते. संपाबाबत त्यांनी सहकाऱ्यांशी बोलताना चिंता व्यक्त केली होती. त्यांच्या अचानक निधनाने कुटुंबीय आणि सहकाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

एसटी कर्मचारी सातत्याने तणाव झेलत काम करत आहेत. रात्रंदिवस ड्युटीमुळे त्यांना मानसिक आणि शारिरीक तणाव सहन करावा लागत आहे, अशा तक्रारी सतत आल्या आहेत. या आंदोलनाच्या निमित्ताने एसटी कर्मचाऱ्यांचे दुखणे अधिक प्रकर्षाने समोर आले आहे. त्यातच राजेंद्र पाटील यांचा धक्कादायक मृत्यू झाल्याने कर्मचाऱ्यांनी हळहळ व्यक्त केली.

हेही वाचा: 'डुकराशी कुस्ती' फडणवीसांच्या इंग्रजी वाक्यावर राऊतांचा मराठी बाणा

loading image
go to top