कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीबाबत खलबतं; हालचाली गतीमान, 16-10 चा फॉर्म्युला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Congress-NCP

पहिल्याच बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली असली तरी काँग्रेसकडून अंतिम निर्णय झालेला नाही.

कॉंग्रेस-राष्ट्रवादीत आघाडीबाबत खलबतं

चिपळूण : येथील पालिकेच्या निवडणुकीच्या हालचाली गतीमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेससोबत आघाडी करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानुसार बुधवारी चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या पार्लमेंटरी बोर्ड पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. पालिकेच्या २६ जागांपैकी १६ जागा राष्ट्रवादीला तर १० जागा काँग्रेसला सोडण्याचा प्रस्ताव राष्ट्रवादीकडून काँग्रेसला देण्यात आला. पहिल्याच बैठकीत आघाडीबाबत चर्चा झाली असली तरी काँग्रेसकडून अंतिम निर्णय झालेला नाही.

माजी आमदार रमेश कदम यांनी पालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबत आघाडी करण्याचा मनोदय व्यक्त केला होता. गत निवडणूक वगळता गेल्या काही वर्षापासून काँग्रेससोबत राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी आहे. गत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप व काँग्रेस स्वतंत्रपणे लढली होती. याचा सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला बसला होता. राष्ट्रवादीचे केवळ ४ नगरसेवक विजयी झाले होते.

हेही वाचा: Facebookवर मिळतात सरासरी 15 धमक्यांच्या, 5 प्रक्षोभक तर 3 द्वेषपूर्ण पोस्ट्स

भाजप आणि शिवसेनेची युती होण्याची शक्यता धूसर आहे. शिवसेनेने एकला चलोची भूमिका ठेवली असून उमेदारांची चाचपणीदेखील केली जात आहे. रमेश कदम यांनी काँग्रेससोबत आघाडीस तयार असल्याचे सांगताच बुधवारी (१०) राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुचयअण्णा रेडीज यांच्या निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादीच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक झाली. पालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी आघाडी करण्याबाबत चर्चा करण्यात आली. शहरात कोणाची किती राजकीय ताकद आहे, याचाही ऊहापोह करण्यात आला.

प्रस्तावाबात कॉंग्रेसची स्वंतत्र बैठक

पालिकेच्या २६ जागांसाठी निवडणूका होणार आहेत. त्यामुळे आघाडीचा धर्म पाळताना काँग्रेसला १० जागा सोडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसने दर्शवली आहे. या १० जागा कोणत्या सोडणार ते मात्र निश्चित झालेले नाही. दरम्यान रेडीज यांच्या निवासस्थानातील संयुक्त बैठक आटोपल्यानंतर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची दुसऱ्या ठिकाणी स्वतंत्र बैठक झाली. त्यामध्ये पालिका निवडणुकीसाठी आघाडी कशा पद्धतीने करावी या विषयीची चर्चा झाली; मात्र आघाडीबाबतचा अंतिम निर्णय झाला नाही.

हेही वाचा: कॅनडातून आणली शतकापूर्वी चोरलेली मुर्ती; अन्नपुर्णा देवीची वाराणसीत होणार पुनर्स्थापना

loading image
go to top