सोलापूर - मंगळवेढ्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 8 जून 2018

मंगळवेढा (सोलापूर) : कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज मध्यरात्रीपासून पुकारलेल्या संपामुळे मंगळवेढा आगारात बाहेरगावी जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासाचे संप व पावसामुळे हाल होत आहेत. बसस्थानकावर प्रवासाची गर्दी असून या संपात शिवसेनेच्या वाहतूक सेना मात्र या संपातील सहभागी झाली नाही. स.11 पर्यंत 51 फेऱया रद्द झाल्या तर चार फेऱ्या फक्त झाल्या. त्यामुळे खासगी वाहनधारकाकडे प्रवासी मागेल त्या दरात पैसे देत प्रवास करीत आहे.

संपामुळे पंढरपूर, सोलापूर, सांगोला, पुणे, तर ग्रामीण भागातील हुन्रूर, शिरनांदगी, लवंगी, सिध्दापूर आदी मार्गावर. खासगी  वाहनाधारकांकडून जादा दराने आकारणी करण्यात येत होती.    

अचानक केलेल्या संपामुळे प्रवाशांची मात्र हाल होत आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांची पगार वाढ अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. सरकारने याबाबत तोडगा न काढल्याने दोन वेळा एसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांनी संप केला होता. प्रत्यक्षात चार हजार रुपयांपर्यंत पगार वाढ मिळाल्याचे कारण देत पुन्हा संपाचे हत्यार उपसले. या संपामुळे वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. मंगळवेढा आगाराच्या प्रवेशद्वारासमोर एसटीच्या विविध संघटनेचे पदाधिकारी व कामगार उपस्थित होते. शिवसेनेचे वाहतूक सेनेचे कर्मचारी मात्र संपावर गेले नसल्याने एसटी सेवा अंशतः सुरू आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अचानक झालेल्या संपामुळे आणि पाऊस यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.

Web Title: st employees on strike in mangalwedha