सांगलीत एसटीचे कर्मचारी मध्यरात्रीपासून संपावर 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

सांगली - महामंडळाने जाहीर केलेली वेतनवाढ व वेतन करारातील अटी मान्य नसल्याबद्दल एसटी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्रीपासून अघोषित संपावर गेले आहेत. संपाबाबत प्रवासी वर्गात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. अनेकांना खासगी वाहनांतून प्रवासाची वेळ आली. ऐनवेळी संप झाल्यामुळे खासगी व्यवसायिकांनी दुप्पट भाडे घेतले. तर रिक्षावाल्यांनी चौपट रक्कम वसुल केली. 

गुरुवारी रात्री अकरापासूनच विविध मार्गांवर धावणाऱ्या गाड्या कर्मचाऱ्यांनी थांबवल्या आहेत. अचानक संपामुळे एसटी मुख्यालयात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यात एसटीचे 4650 कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.   

एसटी कर्मचारी रात्री अकरापासून विविध मार्गांवरील गाड्यांचा ताबा घेण्यासाठी आलेच नाहीत. त्यामुळे प्रवासी वाहतूक थांबली. दोन दिवसांपूर्वीच एसटी महामंडळाने वेतनवाढीचा नवा करार केला. करारात जाचक अटी घातल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यात केलेली वेतनवाढ त्यांना मान्य नाही. अशा कर्मचाऱ्यांनी पुढील पाच वर्षांसाठी कंत्राटी पद्धतीने काम करावे, वार्षिक वेतनवाढ तीन टक्‍क्‍यांवरून दोन टक्के अशी कमी करण्यात आली. एचआरए (भत्ता) 20 टक्‍क्‍यांवरून 14 टक्के इतका कमी करण्यात आला. त्याचबरोबर वेतनवाढीच्या फरकाची रक्कम 48 हफ्त्यांत विभागून दिली जाणार आहे. त्याचबरोबर वेतनवाढीच्या फरकाची रक्कम 48 हफ्त्यांत विभागून दिली जाणार आहे. कर्मचाऱ्यांची बेसिक अधिक 3500 रुपये अशी वेतनवाढीची मागणी होती. मात्र, ती मान्य केलेली नाही. कर्मचाऱ्यांना अपेक्षित वेतनवाढ झालेली नाही. या सर्व मुद्यांवर असणारी कर्मचाऱ्यांची नाराजी अप्रत्यक्षरीत्या केलेल्या कामबंद आंदोलनातून दिसून येत आहे. आंदोलनाचे नेतृत्व अधिकृतरीत्या कोणत्याही संघटनेने केलेले नाही, अगर जबाबदारी स्वीकारलेली नाही.  

एसटी कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाने जाहिर केलेली पगारवाढीची आकडेवारी फसवी आहे. जर आम्हा कर्मचाऱ्यांना शासनाने 32 टक्के वाढ दिली तर महामंडळच चालू शकणार नाही.'' 
संदीप पाटील, चालक

जिल्ह्यातील कामगार सेनेचे कर्मचारी संपात सहभागी झाले नाहीत. कवठेमहांकाळ, आटपाडी तालुक्‍यातील एखादी दुसरी बस रस्त्यावर दिसली. 

Web Title: st strike in sangli