स्टार एअरकडून बेळगाव-भुज विमानसेवा सुरू!

बेळगावातून गुजरातमधील अहमदाबाद आणि भुज थेट जाता येणार आहे.‌ ३ जूनपासून ही नवी सेवा सुरू होत आहे.
Star Air launches Belgaum-Bhuj flight
Star Air launches Belgaum-Bhuj flightsakal

बेळगाव : सांबरा विमानतळावरून आणखीन एका विमानसेवेची भर पडली आहे. स्टार एअरकडून बेळगाव-भुज विमानसेवा सुरू केली जात आहे. त्यामुळे बेळगावातून गुजरातमधील अहमदाबाद आणि भुज थेट जाता येणार आहे.‌ ३ जूनपासून ही नवी सेवा सुरू होत आहे. गुजरातमधील भुज हे शहर एक प्रसिद्ध पर्यटन क्षेत्र म्हणून देखील ओळखले जाते. भारत-पाक युद्धाची संबंधित नुकतेच एक चित्रपट देखील या शहराच्या नावावरून प्रदर्शित झाले होते. वायुसेनेच्या कामगिरीवर आधारित या चित्रपटात अजय देवगण यांची प्रमुख भूमिका राहिली होती. रण आणि कच्छच्या वाळवंटात हे शहर वसलेले असून येथील हस्तकला प्रसिद्ध आहे.

आपल्या गुजराती सांस्कृतिक मी देखील हे क्षेत्र नावाजलेले आहे. त्यामुळे स्टार एअर कडून या ठिकाणी बेळगाव येथून विमानसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३ जूनपासून आठवड्यातून चार दिवस ही नॉनस्टॉप सेवा उपलब्ध असणार आहे.‌ गावातून अहमदाबादमार्गे भुज ही लिंक सेवा असणार आहे. दर सोमवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी बेळगावातून भुजला विमानसेवा असेल सांबरा विमानतळावरील प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. बंगळूर आणि मंगळूर पाठोपाठ बेळगावातील सांबरा विमानतळ राज्यात तिसऱ्या स्थानावर आहे. सांबरा विमानतळावरून दिल्ली, नागपूर, बंगळूरसह मुंबई, हैदराबाद, पुणे, नाशिक, अहमदाबाद, इंदोर, सुरत, तिरुपती, जोधपुर मार्गावर सेवा उपलब्ध करून दिली आहे. सुरत, तिरुपती आणि पुणेमार्गे किशनगड, गुलबर्गा आणि नाशिकला बेळगाव लिंक सेवा उपलब्ध आहे. त्यामुळे विमान सेवा घेणाऱ्या प्रवाशांची संख्याही वाढली आहे. सांबरा विमानतळावरून सध्या स्पाइस जेट, स्टार एअर, इंडिगो, ट्रू जेट, अलायन्स एअर आदी विमान कंपन्यांकडून सेवा दिली जात आहे.

बेळगाव-भुज विमानसेवेचे वेळापत्रक

विमानसेवावारसुटण्याची वेळ - पोहोचण्याची वेळ

  • बेळगाव-भूजसोमवार, गुरुवार, शुक्रवार,‌शनिवारी ९.१० - १२

  • बेळगाव-भूजबुधवार १४.१५ - १७.१०

  • भूज-बेळगाव सोमवार, गुरुवार, शुक्रवार,‌शनिवारी १२.३० - १५.३०

  • भूज-बेळगाव बुधवार १७.३५ - २०.३०

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com