शिक्षक भरतीचे ‘पवित्र’ पोर्टल सुरू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 जुलै 2018

सोलापूर - राज्याच्या शिक्षण विभागाने शिक्षकांची भरती करण्यासाठीचे ‘पवित्र’ नावाचे ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. पोर्टल सुरू करण्याचा निर्णय घेऊन काही महिन्यांचा कालावधी लोटला होता; पण ते पोर्टल सुरू होत नव्हते. अखेर सोमवारपासून (ता. २) ते सुरू झाले आहे. या पोर्टलवर केवळ शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) दिलेले उमेदवारच अर्ज करू शकतात.

राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत. ती पदे ऑनलाइन पद्धतीने भरण्यावर सरकारने लक्ष दिले होते. गरजूंना नोकरी मिळेल, यासाठी सरकारने हे प्रयोजन केले आहे. शिक्षकांची भरती करताना वशिलेबाजीला प्राधान्य दिले जात असल्याचे लक्षात आल्यानंतर ‘पवित्र’ पोर्टलची निर्मिती केली आहे. खासगी शैक्षणिक संस्था व शासनाच्या शैक्षणिक संस्थांमध्ये रिक्त असलेल्या शिक्षक पदांची भरती ही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यामुळे ‘डोनेशन’ (शैक्षणिक निधी) घेऊन नोकरीला लागणाऱ्या शिक्षकांवर गंडांतर येणार आहे. जे शिक्षक ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत, त्यांनाच या पोर्टलवर नोकरी मिळविण्यासाठी अर्ज करता येणार आहे. 

ऑनलाइन अर्ज करण्याच्या मुदतीकडे लक्ष
शिक्षक या पदासाठी पवित्र पोर्टलवर ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. मात्र, हे अर्ज किती तारखेपर्यंत करायचे आहेत, याबाबत काहीच माहिती नसल्याने उमेदवारांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागालाही याबाबत फारशी माहिती नसल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Start the pavitra portal of teacher recruitment