कृषीदिनाचे औचित्य साधून वृक्षलागवडीला आरंभ

राजकुमार शहा 
रविवार, 1 जुलै 2018

मोहोळ : रविवार (ता.1 जुलै) या कृषीदिनाचे औचित्य साधुन मोहोळ येथील सामाजिक वनीकरण विभागातर्फे तेराकोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत पापरी ते अहमदनगर रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवडीचा आरंभ पापरी येथील वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी समाधान भोसले यांच्या हस्ते आज करण्यात आला.

शासनाच्या 13 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमाअंतर्गत वृक्ष लागवडी साठी मोहोळ तालुक्यातील पोखरापुर व सिद्धेवाडी या दोन रोप वाटिकेत करंज, चिंच, आवळा, सिमारोबा, निम, शिरस, सावर, बांबू या वृक्षांची रोपे उपलब्ध आहेत. बांबू हे नगदी पिक आहे, त्यापासून जमिनीची धुप होत नाही, तसेच त्यापासून अनेक वस्तु तयार करता येतात. शेतकरी उपयोगी वृक्ष असल्याने त्याची 40 हजार रोपे तयार आहेत. चालुवर्षी सिमारोबा या वृक्षाचीही लागवड मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे. हा वृक्ष कर्करोगावर उपयोगी आहे.

यावेळी समाधान भोसले म्हणाले, 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी सक्रिय सहभागी होने गरजेचे आहे. पर्यावरण संतुलनासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय आहे. सर्वांनी या मोहिमेला सहकार्य करावे.

तालुक्यात एकूण 94 ग्रामपंचायती आहेत त्यांना 47 हजार रोपे मोफत देण्यात येणार आहेत. यावेळी हरित सेनेचे सदस्य सुदाम वसेकर यांनी प्रतिज्ञा दिली. या प्रसंगी वन क्षेत्रपाल संजय देशपांडे, वनपाल अनिल सोनवणे, पापरीचे उपसरपंच अजित भोसले, वनरक्षक मंजूषा घावटे, अॅडव्होकेट श्रीकांत सुरवसे, ईश्वरी सुरवसे, अजित गुंड, अमोल चव्हाण, बाबुराव भोसले, सोमा भोसले, शरद गोडसे, एल एस शेलार, आदी उपस्थित होते.

Web Title: Start of tree plantation by justifying the agriculture day