सोलापूर - दोन वर्षांपासून बंद असलेली एव्हॉन कंपनी सुरू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

सोलापूर : कोट्यवधी रुपयांचा इफेड्रीन या अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली एव्हॉन ऑर्गनिक्‍स कंपनी पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. कंपनी चालू व्हावी यासाठी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. 

सोलापूर : कोट्यवधी रुपयांचा इफेड्रीन या अंमली पदार्थाचा साठा सापडल्याने गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली एव्हॉन ऑर्गनिक्‍स कंपनी पुन्हा एकदा चालू करण्यात आली आहे. कंपनी चालू व्हावी यासाठी महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. 

एव्हॉन कंपनी बंद झाल्याने निर्दोष कामगारांचे प्रचंड हाल होत होते. महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेने कंपनी व्यवस्थापनाशी वेळोवेळी चर्चा करून दिवाळी सण आणि मुलांच्या शैक्षणीक खर्चासाठी पगार मिळविली होती. दोषींवर कारवाई करा आणि निर्दोष कामगारांच्या हाताला काम द्या अशी मागणी करण्यात आली होती. या मागणीवर पोलिस प्रशासन, व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यात मुंबईत आणि सोलापूरात सकारात्मक चर्चा झाली. त्यात कंपनी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दोन महीन्याचा पगार ऍडव्हान्स देणे, ज्यांचावर कारवाई झाली आहे त्यांना कंपनीत घ्यायचे नाही, तसेच जे कामगार निर्दोष आहेत आणि पूर्वीपासून काम करतात त्यांना कामावरून काढायचे नाही, इथून पुढे नियमित पगार करायचा, प्रलंबीत पगार कंपनीचे उत्पादन सुरू झाल्यावर दिले जातील आदी मुद्यावर सर्वांनुमते निर्णय घेण्यात आला. 

कंपनी पुन्हा चालू करण्याच्या चर्चेत निवृत्त सहायक पोलिस आयुक्त भारत शेळके, कंपनीचे चेअरमन अजित कामत, संचालक राज कैमल, आशिष उजागरे, एचआर उमेश भोसले, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटनेचे उपाध्यक्ष बाळा कसालकर, जिल्हा सचीव जयवंत कोकाटे, आनंद भंवर, बंदेनवाज सय्यद, कामगार प्रतिनिधी मुल्ला, शिरसट, काशीद, अवताडे, हलकट्टी, शेख, शितोळे, रणशुर आदी उपस्थित होते. कंपनी पुन्हा सुरु केल्याबद्दल कामगारांनी स्वाभिमान संघटनेचे प्रदेश संघटक सिध्दाराम जाधव, जिल्हा अध्यक्ष महेश सावंत, संदीप शेट्टी, रिजवान हवालदार, सागर शिंदे, कोकाटे आदींचा सत्कार करून आभार मानले. कामगारांनी कंपनी चालू झाल्याचा आंनद व्यक्त करीत कंपनी परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. 

अंमली पदार्थ असलेल्या इफेड्रीनमुळे एव्हॉन कंपनी बदनाम झाली कंपनी आहे. पण यामुळे निष्पाप कामगारांना त्रास होत होता. कामगार संघटनेने सततचा पाठपुरावा केल्याने यश मिळाले आहे. 
- जयवंत कोकाटे, सचिव, महाराष्ट्र समर्थ कामगार संघटना

Web Title: starts a evon company after 2 years of close down