नोटाबंदीच्या काळात कसोटीला उतरली स्टेट बॅंक

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

दोनच कर्मचारी असून, आश्‍वी शाखेची सर्वांना सेवा
आश्‍वी (ता. संगमनेर) - नोटाबंदीच्या निर्णयापासून आतापर्यंत भारतीय स्टेट बॅंकेच्या आश्‍वी बुद्रुक शाखेतील गर्दी कायम आहे. अशा कसोटीच्या काळातही शाखाधिकारी आनंद जमदडे यांनी एका रोखपालाच्या मदतीने सर्व काम चोखपणे पार पाडले. बॅंकेचे खातेदार या दोघांचे कौतुक करत आहेत.

पंतप्रधानांच्या घोषणेनंतर जवळच्या पाचशे व एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी, खात्यात रकमा भरण्यासाठी सर्वांचीच धांदल उडाली. त्यामुळे बॅंकेच्या बाहेर रस्त्यापर्यंत रांगा लागल्या होत्या. या शाखेचे कार्यक्षेत्र परिसरातील दहा गावांचे असल्याने झुंबड उडाली होती. बॅंकेचे खातेदार नसलेल्यांची बॅंकेत गर्दी होती.

बॅंकेत शाखाधिकारी व दोन रोखपाल एवढेच मनुष्यबळ आहे. त्यातील एक रोखपाल रजेवर होता. तोबा गर्दी उसळल्याने पहिल्या आठ दिवसांत जमदडे यांनी रोखपाल शैलेश बाकळे यांच्या मदतीने सर्वांना सेवा दिली. त्यानंतर प्रीती तिरपुडे रुजू झाल्या. बॅंकेतून 13 दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल झाली. शेतकरी, व्यापारी, दुग्ध व्यावसायिक, विद्यार्थी, नोकरदार या सर्वांनाच चांगली सेवा मिळाल्याची प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली.

Web Title: state bank of india currency ban