राज्य अन्न आयोगाच्या अध्यक्षांचा मोहोळमध्ये सत्कार

राजकुमार शहा
रविवार, 3 जून 2018

देशपांडे हे गेले दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौरा कालावधीत त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्राहकांच्या प्रलंबीत प्रश्नांची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याच्या सुचना देशपांडे यांनी संबंधीताना दिल्या.

मोहोळ : महाराष्ट्र राज्य ग्राहक कल्याण सल्लागार समिती व राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष (मंत्रीस्तर) अरूण देशपांडे यांचा मोहोळ येथे तालुका समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला.

देशपांडे हे गेले दोन दिवस सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौरा कालावधीत त्यांनी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेतला. ग्राहकांच्या प्रलंबीत प्रश्नांची माहिती घेऊन त्यावर कारवाई करण्याच्या सुचना देशपांडे यांनी संबंधीताना दिल्या.

शालेय पोषण आहार अन्नधान्य वितरण तसेच अन्न सुरक्षा कायदा 2013 प्रमाणे आढावा घेतला. देशपांडे यांच्यासोबत विनोद भरते शशीकांत हरीदास दिपक इरकल होते. सोलापूराहुन पंढरपुरकडे जाताना मोहोळ तालुका समितीच्या वतीने देशपांडे यांचा शाल श्रीफळ पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुका अध्यक्ष मुकंद कुलकर्णी, दत्ता कुलकर्णी, राज़न घाडगे, यशोदा कांबळे उपस्थित होते. 

Web Title: state food commission president felicitation in Mohol

टॅग्स