राज्य सरकार सावित्रीच्या लेकीची रुपयावर करते बोळवण   

The State Government  Savitri's  Scholarship Scheme
The State Government Savitri's Scholarship Scheme
Updated on

आटपाडी (सांगली) : दारिद्य्ररेषेखालील आणि अनुसूचित जाती जमातीतील पहिली ते सातवीपर्यंत शिकणाऱ्या मुलींची पटसंख्या वाढविण्यासाठी शासनाकडून प्रत्येक विद्यार्थिनीला एक रुपया प्रोत्साहन भत्ता दिला जातो. पंचवीस वर्षांपूर्वी हा भत्ता सुरू झाला , मात्र त्यात कोणतीही वाढ झाली नाही . वाढलेला शैक्षणिक खर्च पाहता त्यात नव्या सरकारने वाढ करावी, अशी मागणी होत आहे. 


पंचवीस वर्षांपूर्वी सन 1992 मध्ये सावित्रीबाई फुले यांच्या नावे योजना सुरू केली गेली. मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे नाव देण्यामागे सरकारची भूमिका मुलांनी अधिकाधिक शिकावे , शाळेत यावे , ही होती . त्यानंतर एकदाही या प्रोत्साहन भत्त्याच्या वाढीबाबत चर्चा झाली नाही . शिक्षण विभागासह लोकप्रतिनिधीकडून कोणतेही प्रयत्न केले गेले नाहीत . किंबहुना याकडे राज्यातील सर्वांनीच दुर्लक्ष केले आहे. जिल्हा परिषद शाळांतील उपस्थिती वाढविण्यासाठी हा निर्णय घेतला गेला होता. 


हेही वाचा - अमर रहे...अमर रहे...शहीद जोतिबा चौगुले अमर रहे..

आज महागाईने कळस गाठला आहे. शैक्षणिक साहित्याच्या किमतीही वाढल्या आहेत. पन्नास पैशाच्या पेनची किंमत किमान पाच रुपयांवर पोहोचली आहे. दोन-चार रुपयांची पुस्तके 50 ते 100 रुपयांवर पोहोचली आहेत. तरीही सरकारने विद्यार्थिनींच्या भत्त्यात वाढ केलेली नाही. योजनेने रौप्य महोत्सवी वर्ष सुरू झाले आहे. त्यामुळे त्याबाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी होत आहे. या भत्त्यात वाढ न करणे म्हणजे एक प्रकारे सावित्रीच्या लेकींची थट्टा करण्यासारखे आहे.

  आटपाडीत विद्यार्थिनींची संख्या 4 हजार 556

त्याबाबत पूर्वी दुर्लक्ष झाले, मात्र आता करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. एका आटपाडी तालुक्‍यात यासाठी पात्र विद्यार्थिनींची संख्या 4 हजार 556 आहे. गेल्या वर्षी योजनेचे अनुदान आलेले नाही. पात्र लाभार्थी मुलींना यासाठी बरीच कागदपत्रे जमा करावी लागतात, त्याचा खर्चही बराच होतो. त्यामुळे अनेकांनी या योजनेकडे पाठ फिरवली आहे.

सरकारला कळवू  भत्त्यात वाढ व्हावी
'विद्यार्थिनींना मिळणाऱ्या प्रोत्साहन भत्त्यात वाढ व्हावी, अशी मागणी अनेकदा आमच्याकडे करण्यात आली आहे. तो विषय वरिष्ठ पातळीवरील आहे. त्याबाबत नक्की विचार होईल, आम्ही सरकारला तसे कळवू.' 
- अंनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी 

किमान दहा रुपये प्रतिदिन मिळावे
"या काळात एक रुपयाचे मूल्य किती राहिले आहे, हे तपासले पाहिजे. आर्थिक निकषावर प्रोत्साहन भत्त्यात वाढ गरजेची आहे. किमान दहा रुपये प्रतिदिन प्रोत्साहन भत्ता करावा, अन्यथा योजना तरी बंद करावी.'' 
- उत्तम बालटे, सामाजिक कार्यकर्ते  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com