सांगली : मुंबई, ठाणे, पुणे सोलापूरची आघाडी

वाळवा येथे राज्यस्तरीय कबड्डी, खो-खो स्पर्धा ः प्रेक्षकांचा मिळतोय अभूतपूर्व प्रतिसाद
Kabbadi competition
Kabbadi competitionSakal

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी क्रीडानगरी, वाळवा - येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय कबड्डी आणि खो-खो स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे सोलापूर या संघांनी आज आघाडी घेतली. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त या स्पर्धा सुरू आहेत. स्पर्धेसाठी राज्यातील विविध संघ सहभागी झाले आहेत. स्पर्धेस प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद आहे.

सर्व लढती अतिशय रोमांचकारी अनुभव देत आहेत. खो-खो स्पर्धेत आज नवमहाराष्ट्र संघ (पुणे), विहंग क्रीडा मंडळ (ठाणे), लोटस क्रीडा मंडळ (सांगली), शिर्सेकर्स महात्मा गांधी क्रीडा मंडळ (मुंबई उपनगर) हे संघ प्रत्येकी नऊ गुण मिळवून आणि राणा प्रताप क्रीडा मंडळ (कुपवाड), अर्धनारी नटेश्वर क्रीडा मंडळ (सोलापूर), विद्यार्थी क्रीडा मंडळ (मुंबई), ग्रिफीन जिमखाना (ठाणे) हे संघ प्रत्येकी सहा गुण मिळवून बाद फेरीत दाखल झाले. कबड्डीच्या पहिल्या दोन फेऱ्यात जय मातृभूमी क्रीडा मंडळ (सांगली) विरुद्ध राकेश घुले क्रीडा मंडळ (पुणे) यांच्यात झालेला सामना बरोबरीत झाला. या संघांनी प्रत्येकी वीस गुण मिळवून बरोबरी राखली.

जाॅली स्पोर्ट्स (मुंबई) विरूद्ध बी. सी. प्रतिष्ठान (नांदेड) यांच्यातील सामना बी. सी. प्रतिष्ठानने आठ गुणांनी जिंकला. जयहिंद क्रीडा मंडळ (धुळे) आणि नवभारत स्पोर्ट्स (शिरोली) हा सामना जयहिंद संघाने तीन गुणांनी जिंकला.छावा स्पोर्ट्स (शिरोली) संघावर विठ्ठल स्पोर्ट्स (ठाणे) संघाने दहा गुणांनी मात केली. नवभारत स्पोर्ट्सला (शिरोली) विरुद्ध बाबूराव चांदोरे स्पोर्ट्सने १२ गुणांनी पराभूत केले.कबड्डी स्पर्धेसाठी प्रो-कबड्डीचे महेंद्र रजपूत, सुनील दुबीले, किरण मगर, जितेंद्र शिंदे,आद्य शेख, रोहित बन्ने; तर खो-खोचे आंतरराष्ट्रीय खेळाडू नरेश सावंत, सुरेश सावंत, प्रतीक वाईकर, अनिकेत पोटे यांची विशेष उपस्थिती होती. हुतात्मा उद्योग समूहाचे प्रमुख वैभव नायकवडी, वीरधवल नायकवडी कबड्डी आणि खो-खो असोसिएशनचे विविध पदाधिकारी स्पर्धेस उपस्थित होते.दरम्यान, कबड्डीच्या बाद फेरीतील लढती; शिवाय खो-खोचा अंतिम सामना उद्या सकाळी होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com