सोलापूर : मनोरमा साहित्य मंडळी, सोलापूर व महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पश्चिम सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिले जाणारे यंदाचे साहित्य पुरस्कार बुधवारी (ता. 18) जाहीर झाले. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापले यांना मनोरमा बॅंक साहित्य जीवनगौरव पुरस्कार तर डॉ. उमा कुलकर्णी यांना मनोरमा बॅंक साहित्य पुरस्कार दिला जाणार असल्याची माहिती मनोरमा साहित्य मंडळीचे अध्यक्ष श्रीकांत मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हेही वाचाच...धक्कादायक स्वत:च्या चौकशीसाठी स्वत:च नेमली समिती
यंदाच्या पुरस्काराचे वितरण छत्रपती रंगभवन सभागृहात 25 डिसेंबरला सायंकाळी 5.30 वाजता होणार आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. द. ता. भोसले, श्री रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. जनार्दन वाघमारे, ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव आव्हाड, माजी आमदार राजन पाटील, मसापचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे उपस्थित राहणार असल्याचेही श्री. मोरे यांनी या वेळी सांगितले. जीवनगौरव पुरस्कार व साहित्य पुरस्काराचे स्वरुप 21 हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ असे असल्याचेही श्री. मोरे म्हणाले. मनोरमा साहित्य मंडळ 2000 मध्ये स्थापन झाले. मनोरमा साहित्य पुरस्काराच्या निवड समितीचे अध्यक्ष डॉ. द. ता. भोसले, उपाध्यक्ष डॉ. राजशेखर शिंदे, डॉ. महादेव देशमुख, प्रा. माधव कुलकर्णी, राजेंद्र भोसले, डॉ. कविता मुरुमकर यांनी पुरस्कर्त्यांची निवड केली. मनोरमा साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीकांत मोरे, महिला उपाध्यक्षा शोभा मोरे, अस्मिता गायकवाड, उपाध्यक्ष प्रकाश भोसले, सचिव उज्ज्वला साळुंखे, सहसचिव राजेंद्र भोसले यांचेही योगदान मोठे आहे.
हेही वाचाच...छानच की...अपघात रोखण्यासाठी आता 'फोर-ई'चा उपाय
यांना मिळाले पुरस्कार
मनोरमा बॅंक साहित्य जीवनगौरव पुरस्कार : डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
मनोरमा बॅंक साहित्य पुरस्कार : उमा कुलकर्णी
कविता बॅंक साहित्य पुरस्कार : डॉ. रणधीर शिंदे, डॉ. अर्जुन व्हटकर
मनोरमा मल्टिस्टेट साहित्य पुरस्कार : डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर, कालिदास चवडेकर
स. रा. मोरे ग्रंथालयाचा विशेष पुरस्कार : मनोज बोरगावकर, राजेंद्रप्रसाद मसुरकर
कै. नागेशराव सुरवसे साहित्य पुरस्कार : स्वप्नील कुलकर्णी |
|