मिरजेत उभारणार फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा पुतळा

हे शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे या शिल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.
paschim maharashtra
paschim maharashtrasakal
Updated on

सांगली : मिरजेतील योगीनगरमध्ये असलेल्या महापालिकेच्या प्राथमिक आरोग्य केंद्र दहामध्ये परिचारिकांचे दैवत असलेल्या फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा अर्धपुतळा उभारण्यात येणार आहे. नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी स्वखर्चातून हे शिल्प उभारण्याचा निर्णय घेतला आहे या शिल्पाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे.

नगरसेवक योगेंद्र थोरात म्हणाले, कोरोना काळात परिचारकांनी कोरोना रुग्णांची सेवा करणे, घरोघरी जाऊन तपासणी करणे अशी सेवा केली आहे. कोरोना काळात खऱ्या अर्थाने कोरोना योद्धा म्हणून परिचारकांनी कार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगभरातील परिचारिकांचे प्रेरणास्थान असणाऱ्या परिचारिका फ्लोरेन्स नाईटिंगेल यांचा पुतळा उभारण्याचे ठरवले.

paschim maharashtra
'केंद्राने ठरवले तर मराठा आरक्षण शक्य'

आयुक्त नितीन कापडणीस महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वखर्चाने हा पुतळा महापालिकेच्या आरोग्य केंद्र क्रमांक दहा येथे उभारण्यात येत आहे. येथेच त्यांचे स्मारकही असेल.

paschim maharashtra
सोलापूर : महापालिकेच्या गाड्या निघणार स्क्रॅपमध्ये

शिल्पकार अमोल सूर्यवंशी आणि सारिका लाटणे हे फ्लोरेन्स नाईटिंगेल यांच्या शिल्पाची निर्मिती करत आहेत. ते म्हणाले, फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा पुतळा महाराष्ट्रात कुठेही नाही. त्यामुळे त्यांच्या उपलब्ध असलेल्या चित्रावरूनच हा पुतळा निर्माण करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jayant Patil BJP Entry sangli politics
Kavthemahankal youth missing canal accident
Miraj Kolhapur Jalna ST bus attack latest news
sparrow chick falls from nest
Marathi News Esakal
www.esakal.com