
Kavalapur Airport Plotting Under Scanner Action Committee to Meet Collector
Sakal
सांगली: ‘‘कवलापूर विमानतळाच्या १६५ एकर क्षेत्रालगत काही भूखंड विक्री केली जात आहे. काही बांधकामे केली जात असून ती तत्काळ थांबवावीत. जिल्हाधिकाऱ्यांनी त्याबाबत नोटीस जारी करावी,’’ अशी मागणी विमानतळ बचाव कृती समितीच्या बैठकीत आज करण्यात आली. या प्रश्नावर उद्या (ता. १६) जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची भेट घेण्याचेही ठरले.