भटक्‍या कुत्र्यांचा  वाळव्यात त्रास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 जुलै 2018

वाळवा - परिसरात भटक्‍या कुत्र्यांचा त्रास वाढला आहे. लहानमोठ्या जनावरांसह नागरिकांना त्यांच्या हल्ल्याचा फटका बसला. विविध भागात शेळ्या-मेंढ्यांवर त्यांचे हल्ले वाढलेत. कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने करावा, अशी मागणी आहे. 

मध्यवर्ती हुतात्मा चौकात तर शेकड्याच्या पटीत भटकी कुत्री आहेत. मटण व मच्छी मार्केट असल्याने त्यांचा वावर कायम आहे. सायंकाळनंतर त्यांचा कळप नागरिकांना ये-जा करू देत नाही. 

पेठभागातील मटण मार्केटजवळ अशीच स्थिती आहे. गल्लीबोळात कुत्र्यांचे कळप दहशत माजवून आहेत. काही महिन्यांपासून तर त्यांचे हल्ले वाढलेत. लहान मुलांनाही धोका निर्माण झाला आहे. रात्री ती शेळ्या मेंढ्यांवर कळपाने हल्ला करतात. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. प्रमुख चौकात तर माणसांपेक्षा कुत्री जास्त असे चित्र आहे. त्याचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.

Web Title: street dog issue in walva

टॅग्स