मंगळवेढा नगरपरिषद कर्मचारी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी जोरदार निदर्शने 

हुकूम मुलाणी
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

मंगळवेढा - महाराष्ट्र नगरपरिषद कर्मचारी संघटनेची मुख्यमंत्री सोबत मुंबई येथे बैठक होवून एक वर्षाचा कालावधी होवूनसुध्दा आश्वासन दिल्याप्रमाणे एकही मागणी पुर्ण न केल्याने व सातवा वेतन आयोग त्वरीत लागू करणेकामी हालगी वाजवून आपल्या मागण्या संदर्भात नगरपालिकेसमोर जोरदार घोषणाबाजी करण्यांत आली.

यावेळी सर्व कर्मचा-यांनी काळ्या फिती लावून व कपाळावरती काळा तिलक लावून सरकारचा निषेध नोंदविला. सदर निर्दशनाकडे शासनाने दुर्लक्ष केल्यास दि.27,28 व 29 ऑगस्ट 2018 या तीन दिवशी नगरपरिषदेचे कामकाज पुर्णपणे बंद करणेत येणार आहे. याबाबतची निवेदन मुख्यमंत्री सो, नगरविकास राज्यमंत्री सो, खा.शरद बनसोडे, आ.भारत भालके, प्रधान सचिव सो, जिल्हाधिकारी याना देण्यांत आले. 

यावेळी नगरपरिषदेचे पक्षनेते, अजित जगताप, उपाध्यक्ष चंद्रकांत घुले, सभापती प्रविण खवतोडे, माजी नगरसेवक चंद्रकांत पडवळे यांनी या निदर्शनास पाठिंबा देवून कर्मचारी संघटनेने केलेल्या मागण्या रास्त असून शासनाने त्याची गंभीर दखल घेवून त्वरीत पुर्तता करावी असे मत व्यक्त करुन आपला पाठिंबा दर्शविला. मंगळवेढा नगरपरिषद कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब पवार यांचे नेतृत्वाखाली संपुर्ण कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने या निदर्शनात सहभागी झाला होता.

Web Title: Strong demonstrations for various demands from the Mangalvedha Municipal Council