Sangli : वडिलांना कडेवर उचलून आला श्रावणबाळ: जिल्हा परिषदेत प्रकार; बोळ रस्त्यासाठी न्याय मागायला हेलपाटे

Struggling for Justice : गाडी उभी करून मुलाने त्यांना काखेत उचलून घेतले आणि पायऱ्या चढत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाकडे चालू लागले. मागणी काय तर घरात जायचा बोळरस्ता एकाने अडवलाय.
A son’s heartfelt plea to the district council, carrying his father on his shoulders to demand justice for Bol road.
A son’s heartfelt plea to the district council, carrying his father on his shoulders to demand justice for Bol road.sakal
Updated on

सांगली : जिल्हा परिषदेच्या आवारात दुचाकी थांबली... मुलगा गाडी चालवत होता, मध्ये वडील आणि पाठीमागे त्यांना धरून सूनबाई बसल्या होत्या. गाडी उभी करून मुलाने त्यांना काखेत उचलून घेतले आणि पायऱ्या चढत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कक्षाकडे चालू लागले. मागणी काय तर घरात जायचा बोळरस्ता एकाने अडवलाय. तो खुला करून द्या. आम्हाला घरात जायला वाट हवी... दीड वर्षे हा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करून शासकीय व्यवस्थेचा भाग होऊ पाहणारा ‘श्रावणबाळ’ त्याच व्यवस्थेकडे आज न्यायासाठी खेटे घालताना पाहून सर्वांनाच धक्का बसला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com