विद्यार्थी बनणार स्वच्छतेचे "ब्रॅंड ऍम्बॅसिडर' 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

सातारा - स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शाळा, शिक्षण संस्थांमध्ये एक ते 15 सप्टेंबर दरम्यान "स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. या कालावधीत स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी "विद्यार्थी राजदूत' (स्टुडंट ऍम्बॅसिडर्स) यांच्या नियुक्‍त्या केल्या जातील. तसे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

सातारा - स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शाळा, शिक्षण संस्थांमध्ये एक ते 15 सप्टेंबर दरम्यान "स्वच्छ भारत पंधरवडा' साजरा केला जाणार आहे. या कालावधीत स्वच्छतेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी "विद्यार्थी राजदूत' (स्टुडंट ऍम्बॅसिडर्स) यांच्या नियुक्‍त्या केल्या जातील. तसे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन ऑक्‍टोबर 2019 पर्यंत स्वच्छ भारताचे ध्येय साध्य करण्याचे ठरविले आहे. त्या अनुषंगाने हा पंधरवडा साजरा करावा, असे आदेश केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाने दिले आहेत. त्याप्रमाणे राज्यातील सर्व शाळा आणि शिक्षण संस्थांमध्ये हा पंधरवडा साजरा करण्याबाबत राज्य सरकारने सूचना दिल्या आहेत. पंधरवड्यात चित्रकला, वादविवाद अशा स्पर्धांद्वारे स्वच्छतेविषयी जनजागृती केली जाईल, तसेच स्वच्छता शपथ घेतली जाणार आहे. यात विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. 

पंधरवड्याच्या पहिल्या आठवड्यात शाळा व्यवस्थापन समिती, पालक-शिक्षक संघ यांच्यात बैठका घेण्यात येतील. मुलांमध्ये, शिक्षकांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित करण्यात येईल. त्याचबरोबर शाळा आणि घरांमध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धतीचा वापर करण्यास प्रोत्साहित केले जाणार आहे. 

खासदारांचा सहभाग  
सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान व शालेय पोषण आहार समितीचे अध्यक्ष खासदार, तर सदस्य सचिव हे जिल्हाधिकारी असतात. त्यामुळे स्वच्छतेचा प्रचार, प्रसार करण्यासाठी या समितीची बैठक घ्यावी, अशा सूचनाही आहेत. 

राबविण्यात येणारे उपक्रम...  
शाळा, शैक्षणिक संस्थांमधील स्वच्छताविषयक सुविधांची तपासणी 
विद्यार्थी, शिक्षक, पालकांसाठी चित्रकला, वादविवाद स्पर्धा 
स्वच्छ, सुव्यवस्थित परिसर, शौचालयांसाठी स्पर्धा 
स्थानिक लोकप्रतिनिधींसह स्वच्छतेचा प्रचार करणे 
ओला, सुका कचरा वेगळा करण्यावर जागरुकता 
शाळांतील नादुरुस्त साहित्यांचे निर्लेखन करणे 
स्वच्छतेचे इ-बॅनर तयार करून प्रचार करणे 
स्वच्छ भारतावरील गीतांचे प्रसारण करणे 

Web Title: Student becomes cleaner brand ambassador