शाळकरी मुलाचा बुडून मृत्यू

राजेंद्र होळकर
शुक्रवार, 18 मे 2018

इचलकरंजी : विहिरीमध्ये पोहत असताना अचानक चक्कर आल्याने एक शाळकरी विद्यार्थी पाण्यात बुडून मयत झाला. राहुल संजय मिरगे (वय १३, मूळ रा.माणकापूर, ता.चिक्कोडी, सध्या रा. दुर्गा माता मंदीराशेजारी, जुना चंदूर रोड, इचलकरंजी) असे त्याचे नाव असून, तो एकुलता आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

मृत राहुल मिरगे याच्या वडिलांचा दोन वर्षापूर्वी मृत्यू झाला. त्यामुळे त्यांची आई त्याला घेऊन काही महिन्यांपासून येथील जुना चंदूर रोडवरील दुर्गा माता मंदिराशेजारी राहण्यास आली आहे. आज दुपारी राहुल पोहण्यासाठी म्हणून घराशेजारील शेतवडीमधील विहिरीमध्ये गेला होता. यावेळी त्याला चक्कर आल्याने त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याची नोंद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. 

Web Title: Student Drawn in water died