प्रा. गुंडुराव कांबळेचे वकीलपत्र स्वीकारू नका

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

चंदगड : विद्यार्थिनींशी अश्‍लील वर्तन करणाऱ्या प्रा. गुंडुराव कांबळे याचे वकीलपत्र स्वीकारू नये, अशा मागणीचे निवेदन आज विद्यार्थ्यांनी येथील न्यायालयातील वकील बार असोशिएशनला दिले.

प्रा. कांबळेकडून विद्यार्थिनींशी अश्‍लील संदेश पाठवणे, जाणीवपूर्वक सलगी वाढवण्याचे प्रकार केले जायचे. या विरोधात येथील पोलिसांत त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याचे हे कृत्य निषेधार्ह असून, वकिलांनी सामाजिक बांधिलकीतून त्याला विरोध करावा. त्याचे वकिलपत्र घेऊ नये, अशी मागणी केली.

बार असोशिएशनचे अध्यक्ष ऍड. एस. एस. पाटील होसूरकर, ऍड. जी. एन. दळवी, ऍड. एन. जी. आजरेकर, ऍड. संतोष मळवीकर, ऍड. विष्णू गावडे, प्रा. एन. एस. पाटील उपस्थित होते.

Web Title: students ask advocates reject not to accept case

टॅग्स