विद्यार्थ्यांनी विचारलेल्या खेकड्यांच्या प्रश्नावर आदित्य म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जुलै 2019

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून (बुधवार) सुरु झाला. आदित्य ठाकरे यांनी सोलापुरात ‘आदित्य युवा संवाद’ कार्यकमातंर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने अवघड पण थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकते, यावेळी तानाजी सावंत हेही उपस्थित होते.

सोलापूर : खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटले असे वक्तव्य करणारे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीतच विद्यार्थ्यांनी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना खरंच खेकड्यांमुळे धरण फुटते का, असा प्रश्न विचारला. 

आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून (बुधवार) सुरु झाला. आदित्य ठाकरे यांनी सोलापुरात ‘आदित्य युवा संवाद’ कार्यकमातंर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये आदित्य ठाकरेंना एका विद्यार्थ्याने अवघड पण थेट प्रश्न विचारला. खेकड्यामुळे धरण कसं फुटू शकते, यावेळी तानाजी सावंत हेही उपस्थित होते.

या प्रश्नाला उत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले, की एखाद्या ठिकाणी एखादी जागा खेकड्यांनी भुसभुशीत केली असेल तर धरण फुटू शकते हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे. धरण फुटण्यासाठी अनेक कारणं असू शकतात, त्यापैकी एक कारण म्हणजे खेकडे असू शकतात. 

सोलापूर जिल्ह्यातील स्थानिक विद्यार्थी जे विविध परीक्षा पास होतात, त्यांना रोजगारासाठी पुणे आणि मुंबईत जावे लागते. त्यांना आयटीमधील नोकऱ्या सोलापुरात उपलब्ध व्हाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्यावेळी आदित्य यांनी अशा कंपन्या सोलापुरात आणण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: students ask quastions to Aditya Thackeray on carbs