पुत्रदा एकादशीला विद्यार्थ्यांकडून एक घास वृध्दांसाठी

हुकूम मुलाणी
गुरुवार, 23 ऑगस्ट 2018

मंगळवेढा : येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील इयत्ता 11 वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून एक घास वृध्दांसाठी यामधून ज्वारीचे दान करून अनोखी वारी प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी घडवली आहे.

मंगळवेढा : येथील श्री विद्या विकास मंडळ संचलित श्री संत दामाजी महाविद्यालयातील इयत्ता 11 वी कला शाखेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याकडून पुत्रदा एकादशीचे औचित्य साधून एक घास वृध्दांसाठी यामधून ज्वारीचे दान करून अनोखी वारी प्रा विनायक कलुबर्मे व प्रा धनाजी गवळी यांनी घडवली आहे.

प्रारंभी श्री विठ्ठलाच्या मुर्तीचे पुजन वृध्द माता पित्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मुलाबाळाशिवाय वृध्दाश्रमात आपले उर्वरीत आयुष्य जगत असणाऱ्या श्रीकांत देशपांडे व सुनंदा छत्रे या जेष्ठांनी आमच्यावर वृध्दाश्रमात येण्याची वेळ का आली याबद्दल आपले अनुभव विदयार्थ्यांना सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी केलेल्या धान्याचा घास खरोखरचं गोड लागेल असे सांगून मुले आमच्यापर्यंत आल्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.  वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक राक्षे सरांनी श्री संत दामाजी महाविद्यालयाच्या सहकार्याबद्दल आभार मानले. यावेळी सर्व मुला मुलींनी आम्ही जीवंत असेपर्यंत आई-वडील व सासू-सासऱ्यांची चांगली सेवा व पालनपोषन करण्याची शपथ देऊन उपक्रमाचा समारोप करण्यात आला.

आज पैशाच्या श्रीमंतीपेक्षा आई वडीलांची श्रीमंती महत्वाची आहे. यासाठी निराधार वयोवृध्दांना आधार देण्याची काळाची गरज असल्याचे प्रा. विनायक कलुबर्मे यांनी व्यक्त केले. यात रेणुका कणासे, अफरीन शेख, करिना कांबळे, शुभांगी पाटील, रोहिणी दवले, सोनाली दवले, विशाखा दवले, काजल वाघमारे, सोनाली अवघडे, आरती अवघडे, प्रज्ञा काळूंगे, संध्या होवाळ, शितल शिंदे, स्वप्निल इंगळे, अमीर पटेल, स्वप्निल भिंगे, अरविंद शिवशरण, सचिन गायकवाड, अनिल रेवे, परमेश्वर खराडे, प्रमोद माळी, संजय सावंत, ऋतुराज लोखंडे, रोहित मेटकरी, रोहित ढावरे, रितेश कौंडूभैरी, सिध्दाराम कपले, किरण वाघमारे, अक्षय बळछत्रे, प्रविण कांबळे आदी विदयार्थांनी या उपक्रमात सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल संस्थेचे समन्वयक राहूल शहा, सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ एन बी पवार, उपप्राचार्य प्रा. सदाशिव कोकरे, पर्यवेक्षक प्रा. राजेंद्र गायकवाड सह सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Web Title: students helping the people of the old age homes