विद्यार्थ्यांनी बनवली ई-मालवाहू रिक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

इंधनबचत, प्रदूषण टळणार; कारखानदारांसाठी उपयुक्त, ‘केबीपी’चे यश
सातारा - जिद्द, चिकाटी व मेहनतीची तयारी ठेवल्यास कोणतीही गोष्ट शक्‍य असल्याचे कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (प्रॉडक्‍शन विभाग) विद्यार्थ्यांनी सिद्ध केले आहे. या विद्यार्थ्यांनी निर्मित केलेली ई-मालवाहू रिक्षा कारखानदारांना उपयुक्त ठरू शकते. ही रिक्षा १२ व्होल्टच्या चार बॅटऱ्यांवर चालते. केवळ ३५ रुपयांत या बॅटऱ्या चार्ज होतात. सुमारे ५०० किलोचे वजन १०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून नेण्याची या रिक्षांची क्षमता आहे. त्यामुळे इंधनाचीही बचत होणार आहे. 

या महाविद्यालयातील आकाश मोहिते, धीरज नावडकर, रिषभ बकरे, प्रतीक निंबाळकर, सेवा शेलार व अनुराग देवरे या विद्यार्थ्यांनी ई- मालवाहू रिक्षाची निर्मिती केली आहे. ‘केबीपी’ कॉलेजचे डॉ. एच. ए. मांडवे,

‘स्पार्क इंजिनिअरिंग’चे संचालक राजेश कोरपे आदींच्या उपस्थितीत नुकतेच या ई- मालवाहू रिक्षाचे उद्‌घाटन झाले. त्यावेळी अनेकांनी या प्रयोगाचे कौतुक केले. कार्यक्रमास उपप्राचार्य आर. जे. देवी, विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक प्रा. संभाजी माने, प्रा. ए. बी. पिसाळ, प्रा. आर. एम. फरांदे, इलेक्‍ट्रॉनिक विभागाचे प्रमुख प्रा. यु. एस. शिंगटे, प्रा. दयानंद घाटगे, शिक्षक, पालक उपस्थित होते. ई- मालवाहू रिक्षा कारखानदारांना उपयुक्त ठरू शकते, असा विश्‍वास राजेश कोरपे यांनी व्यक्त केला. यावेळी प्राचार्य डॉ. मांडवे यांनी ‘मास’च्या माध्यमातून औद्योगिक वसाहतीमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असतानाच प्रकल्पांसाठी प्रत्यक्ष अनुभव घेता येत असल्याचे नमूद केले. 
प्रकल्पाबाबत आकाश मोहिते म्हणाला, ‘‘आम्ही सर्वांनी कंपन्यांतून सर्व्हे करून कारखानदारांची नेमकी काय गरज आहे, हे जाणून घेतले. एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत माल पोचवण्यासाठी आम्हाला खूप खर्च येतो.

त्यासाठी कमी खर्चात वाहतुकीचे साधनाची निर्मिती करण्याचा स्पार्क इंजिनिअरिंगचे सीइओ राजेश कोरपे यांनी सल्ला दिला. ‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर आम्ही बॅटरीवर चालणारी ई-मालवाहू रिक्षा तयार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी पुणे, दिल्ली येथील कारखानदार, रिक्षाचालकांना भेटून रिक्षाचे डिझाइन तयार केले. दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर रिक्षाची निर्मिती झाली. निर्मितीचा खर्च एक लाख रुपये आला. त्याचे प्रायोजकत्व ‘स्पार्क इंजिनिअरिंग’ने दिले होते. आता या रिक्षाचा वापर कंपनी करेल.’’ 

‘मेक इन इंडिया’च्या धर्तीवर आम्ही बॅटरीवर चालणारी ई-मालवाहू रिक्षा तयार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी पुणे, दिल्ली येथील कारखानदार, रिक्षाचालकांना भेटून रिक्षाचे डिझाइन तयार केले. दोन महिन्यांच्या परिश्रमानंतर रिक्षाची निर्मिती झाली आहे.
- आकाश मोहिते, ‘केबीपी’ कॉलेज, सातारा

ई-मालवाहू रिक्षाची वैशिष्ट्ये
१२ व्होल्टच्या चार बॅटऱ्यांवर चालते 
केवळ ३५ रुपयांत बॅटऱ्या चार्ज होतात 
सुमारे ५०० किलोचे वजन १०० किलोमीटर अंतरापर्यंत वाहून 
नेण्याची क्षमता
इंधनाची मोठ्या प्रमाणात बचत 
 
Web Title: The students made the e-cargo autos