सुभाष देशमुख यांच्या स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या  

subhash-deshmukh
subhash-deshmukh

सोलापूर - "कुणाला खुश करण्यासाठी नको तर पारदर्शीपणे कारभार करा'', अशा शब्दांत सहकारमंत्री म यांनी स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱ्यांना कानपिचक्‍या दिल्या. प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु असल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

स्मार्ट सिटी सल्लागार समितीची बैठक श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आज झाली. महापौर शोभा बनशेट्टी, उपमहापौर शशीकला बत्तुल, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, महापालिकेचे आयुक्त तथा स्मार्ट सिटी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्यासह सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते. 

स्मार्ट सिटीअंतर्गत शहरात नव्या तेरा रस्त्यांच्या कामाला मंजुरीचा प्रस्ताव आला होता. त्यावेळी श्री. नरोटे यांनी हे सर्व रस्ते शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून जातात. शिवाय अनेक रस्ते हे गल्लीबोळापर्यंत नेले आहेत. स्मार्ट सिटीमध्ये अशा पद्धतीने रस्ते करायचे आहेत का, असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यावेळी सहकारमंत्री देशमुख यांनी त्याची गंभीरपणे दखल घेतले. ते म्हणाले,""कुणाला एकाला खुश करण्यासाठी अशा पद्धतीने काम करू नका. पारदर्शी काम करा. एबीडी एरियामध्ये ज्या परिसराचा समावेश होतो, त्या ठिकाणच्या रस्त्यांना प्राधान्य द्या. प्रकल्पाचे काम अत्यंत संथपणे सुरु आहे. ते वेगाने सुरु करण्याबाबत प्रयत्न करा.'' 

यावेळी घनकचरा व्यवस्थापन, ई टॉयलेट्‌स, एबीडी क्षेत्रातील पाणीपुरवठा, स्मार्ट चौक व स्मार्ट रस्त्यांच्या कामाची प्रगती, होम मैदानावरील काम, शहरात बसविण्यात येणारे एलईडी, सोलर रुफटॉप, शहरात विविध ठिकाणी वॉल पेंटींग करणे, लाईट ऍन्ड साऊंड शो, डिपार्टमेंट गार्डन, आखाडा, दहा किलोमीटर परिसरातील रस्त्यांचा विकास, नॉर्थकोट, लक्ष्मीमंडई, महापालिकेची जुनी व नवी ईमारत, महापालिका शाळांमध्ये सुधारणा या विषयांवर चर्चा झाली. 

आक्षेप असणारे रस्ते -
पार्क चौक ते कोंतम चौक, बाराईमान चौक ते रंगा चौक, सरस्वती चौक ते दत्त चौक, पांजरापोळ चौक ते भुलाभाई चौक, पांजरापोळ चौक ते मेंडके अड्डा, बाळीवेस मल्लिकार्जुन मंदीर ते चौपाड मंदीर, दत्त चौक ते जिल्हा परिषद चौक, लक्ष्मी मार्केट ते विजापूरवेस, भय्या चौक ते गांधी चौक, फडकुले सभागृह ते डफरीन चौक, एलआयसी कॉर्नर ते नॅशनल हायस्कूल, शुभराय आर्ट गॅलरी ते पटवर्धन चौक. 

"सीईओ'पदी तुमची नियुक्ती कुणी केली - सहकारमंत्री 
स्मार्ट सिटीच्या सीईओपदी तुमची नियुक्ती कोणी केली, असा प्रश्‍न सहकारमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना विचारला. त्यावेळी, शासनानेच नियुक्ती केल्याचे सांगितले. एकाचवेळी दोन जबाबदाऱ्या सांभाळणे शक्‍य आहे का? असे विचारल्यावर, आयुक्तांनी मी जबाबदारी सोडायला तयार आहे, असे वक्तव्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com