द्राक्ष, डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी आच्छादन देण्याचा निर्णय घेणार

द्राक्ष, डाळिंब बागांच्या संरक्षणासाठी आच्छादन देण्याचा निर्णय घेणार

सांगली - द्राक्ष व डाळिंब बागांचे पाऊस, गारपिटीपासून संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांना प्लास्टिकचे आच्छादन (शेडनेट) प्रायोगिक तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. आमदार अनिल बाबर यांनी याबाबत सातत्याने विधिमंडळात पाठपुरावा केला आहे. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील दीड लाख एकर शेतीला याचा फायदा होणार आहे.

कृषी राज्यमंत्री खोत म्हणाले,‘‘जिल्ह्यात द्राक्ष व डाळिंबाचे मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे. दिवसेंदिवस  त्यात वाढ होत आहे. या पार्श्‍वभूमीवर आमदार अनिल बाबर यांनी विधानसभेत अनेकदा याबाबत मागणी केली होती. असे सांगून कृषी राज्यमंत्री श्री. खोत म्हणाले, ‘‘आमदार अनिल बाबर यांनी याबाबत विधानसभेत सातत्याने मागणी केली आहे. फलटण येथील गिरवी गावात असा प्रयोग केला आहे. त्याचीही पाहणी करणार आहे. राज्य शासन याबाबत आत्मा तसेच गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान देईल.’’

‘‘शेतकऱ्यांच्या उत्पादनांना हुकमी बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पिकांचे गावनिहाय बॅंडिंगचा आमचा प्रयत्न आहे. शेती फायद्यात येण्यासाठी हा प्रयोग राबवला जाईल. सांगलीची जशी हळद, द्राक्ष, डाळिंब प्रसिद्ध  आहे. आटपाडी तालुक्‍यातील डाळिंब, तासगाव- मिरज तालुक्‍यातील द्राक्ष तसेच शिराळा तालुक्‍यातील भात, आटपाडी तालुक्‍यातील मांडदांडी ज्वारी असे विविध पिकांचे बॅंडिग केले जाईल. तालुका नव्हे तर भविष्यात गावनिहाय पिकांचे बॅंडिंग करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.’’

परदेशानंतर आपल्या परिसरातील फलटणमधील गिरवी गावात द्राक्षबागांसाठी प्लास्टिक आच्छादनाचा  वापर सुरू झाला आहे. द्राक्षासाठी एकरी सर्वसाधारण ३ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. प्लास्टिक आच्छादनाचे आयुष्य ११-१२ वर्षे आहे. लोखंडा दीर्घायुषी आहे. दोऱ्या चार-पाच वर्षांनी बदलाव्या लागतील. मात्र रोगराई, पाणीटंचाई, पाऊस, गारपिटीपासून द्राक्षांचे संरक्षण आणि शेतकऱ्यांना पिकाच्या उत्पन्नाची चांगली हमी मिळेल. 
- आमदार अनिल बाबर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com