मेंदूमध्ये रक्त गोठून मरणाशी झुंज देणाऱ्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया | Surgery | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेंदूमध्ये रक्त गोठून मरणाशी झुंज देणाऱ्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

मेंदूमध्ये रक्त गोठून मरणाशी झुंज देणाऱ्या रुग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया

बेळगाव - मेंदूमध्ये रक्त गोठून जीवन मरणाशी झुंज देणाऱ्या एका रुग्णावर जिल्हा रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. डॉ. शंकर मलपूरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगावातील एका ३८ वर्षीय गरीब तरुणावर ही शस्त्रक्रिया केली आहे.

अचानक उच्च रक्तदाब (बीपी) वाढल्याने एका ३८ वर्षीय आप्पासाहेब नामक तरुणाच्या मेंदुतील रक्त वाहिन्या फुटून रक्त गोठले होते. त्यामुळे त्याचे केवळ हृदय सुरू होते. पण, त्याचा शहरावरील ताबा पूर्णपणे सुटला होता. खाणे पिणे बंद, डोळेही उघडत नसे हाता पायासह शहराला कोणत्याही प्रकारची शुद्ध नव्हती. त्यामुळे त्याला कुटुंबियांनी चार दिवसांपूर्वी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. डोकीचे सिटीस्कॅन केल्यानंतर त्याच्या डोकीत रक्त गोठल्याचे निदान झाले. अशा प्रकारच्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हा रुग्णालयात नुरो सर्जन नाही. त्यामुळे यापूर्वी अशा प्रकारच्या रुग्णांना एखादा खासगी रुग्णालयात किंवा हुबळी येथील किम्स रुग्णालयात हलविण्याचा सल्ला देण्यात येत होता.

हेही वाचा: कोल्हापूर : भाजपच्या उमेदवाराबाबत दोन दिवसांत शिक्कामोर्तब

पण, सेवा निवृत्तीनंतर बिम्समध्ये प्राध्यापक म्हणून काम करणारे जनरल सर्जन डॉ.शंकर मलपुरे यांनी असपल्या अनुभवाच्या जोरावर संबंधित रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केली. जीवन मरणाशी झुंज देणारा तो रुग्ण आता शुद्धीत आला असून त्याच्या शरीराची हालचाल देखील सुरू झाली आहे. आता तो स्वतः पाणी देखील पीत आहे. तसेच आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वांनी आरोग्याकडे दुर्लक्ष नकरता आठवड्यात एकदा किंवा महिन्यातून एकदा तरी नियमितपणे बीपीची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन देखील डॉ. शंकर मलपुरे यांनी यावेळी केले.

loading image
go to top