साखर कारखाने करणार थेट इथेनॉल निर्मिती

तात्या लांडगे
रविवार, 7 ऑक्टोबर 2018

सोलापूर : उसापासून थेट इथेनॉल तयार करण्याला केंद्र सरकारने साखर कारखान्यांना परवानगी दिली आहे. त्यासाठी इथेनॉल प्रकल्प देशात वाढावेत म्हणून सहा हजार कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्जदेखील पाच वर्षांसाठी उपलब्ध करून दिले आहे. त्यानुसार आता महाराष्ट्रात 35 ते 40 तर देशात 114 प्रकल्प सुरू होणार आहेत. 

साखर कारखान्यांना यापुढे उसाच्या रसापासून अथवा बी मोलॅसिसद्वारे थेट इथेनॉल निर्मिती करता येणार आहे. एखाद्या कारखान्यात अशा पद्धतीने तयार होणारे 600 लिटर इथेनॉल म्हणजे एक टन साखर असे प्रमाण गृहीत धरून उसातील साखरेचा सरासरी उतारा काढला जाणार आहे. मागील वर्षी साखरेची मागणी 250 लाख टन असतानाही साखरेचे उत्पादन मात्र 322 लाख टन झाले. त्यामुळे देशात अतिरिक्‍त साखरेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने दर घसरले आणि शेतकऱ्यांना एफआरपी देणे कारखान्यांना मुश्‍कील झाले. त्यावर इथेनॉल प्रकल्प हाच उत्तम पर्याय असल्याचे गृहीत धरून केंद्र सरकारने नियोजन केले आहे. सोलापुरातून सर्वाधिक नवे 11 प्रस्ताव प्राप्त झाल्याचे सहकार आयुक्‍तालयाकडून सांगण्यात आले. 

आकडे बोलतात... 

प्रतिलिटर इथेनॉलचे दर 
बी मोलॅसिस -47.49 रुपये 
सी मोलॅसिस -43.70 रुपये 

प्रत्यक्षातील गरज 
58.50 कोटी लिटर 
निर्माण होणारे इथेनॉल 
21.88 कोटी लिटर 

यंदा देशातील साखरेचे उत्पादन 355 लाख टन होईल असा अंदाज आहे. त्यातच पुन्हा मागील हंगामातील साखरही खूप शिल्लक आहे. त्यामुळे इथेनॉल प्रकल्प वाढविणे हाच त्यावर पर्याय आहे. देशात पेट्रोलमध्ये 10 टक्‍के इथेनॉल मिसळण्याला परवानगी आहे. परंतु, पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसल्याने सध्या फक्‍त चार टक्‍केच इथेनॉल मिसळले जाते. इथेनॉलला मिळणारे वाढीव दर 1 डिसेंबरपासून लागू होणार आहेत.

Web Title: sugar factories will produce ethanol