दहा कारखान्यांनी उरकले गाळप

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

साखरनिर्मितीत कोटींची उड्डाणे; ८६.७७ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप
सातारा - जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, आतापर्यंत चार सहकारी आणि सहा खासगी अशा दहा कारखान्यांच्या गाळपाची सांगता झाली आहे. उर्वरित चार सहकारी कारखान्यांचे गाळप अंतिम टप्प्यात आले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील सर्व कारखान्यांनी मिळून ८६ लाख ७७ हजार २०१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल (दहा हजार टन) साखरेची निर्मिती केली आहे. या वर्षी विक्रमी साखरनिर्मिती झाली आहे. 

जिल्ह्यात एकूण १५ साखर कारखाने असून, गेल्या पाच महिन्यांपासून (नोव्हेंबर) कारखाने उसाचे गाळप करत आहेत. आतापर्यंत कारखान्यांनी ८६ लाख ७७ हजार २०१ मेट्रिक टन उसाचे गाळप करून त्यातून एक कोटी तीन लाख ७७ हजार ४०५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यामध्ये खासगी सहा कारखान्यांनी ३७ लाख ०६ हजार ५४९ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ४३ लाख २१ हजार ५५० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

यासाठी ११.६६ टक्के साखर उतारा मिळाला आहे, तर सहकारी नऊपैकी प्रतापगड वगळता उर्वरित आठ साखर कारखान्यांनी ४९ लाख ७० हजार ६५२ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ६० लाख ५५ हजार ८१० क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे. त्यासाठी त्यांना १२.१८ टक्के साखर उतारा मिळाला आहे. आतापर्यंत श्रीराम फलटण, लोकनेते बाळासाहेब देसाई कारखाना पाटण, रयत, खंडाळा तालुका, न्यू फलटण शुगर, जरंडेश्‍वर, जयवंत शुगर, स्वराज्य इंडिया, ग्रीन पॉवर आणि शरयू शुगर या दहा कारखान्यांनी गाळप उरकले आहे.   

कारखानानिहाय ऊस गाळप मेट्रिक टनांत आणि कंसात साखरनिर्मिती क्विंटलमध्ये पुढीलप्रमाणे आहे. श्रीराम फलटण : ३८५९३५ (४४८६५०), कृष्णा कारखाना : ११५७२५० (१४७२२८०), किसन वीर भुईंज : ६९२६७० (८१८९००), लोकनेते देसाई कारखाना : २०४१५७ (२४२०२५), सह्याद्री : १२५६५०० (१५६२१९५), अजिंक्‍यतारा शेंद्रे : ६०७९८० (७३३८२०), रयत कऱ्हाड : ३७५०००(४४४९४०), खंडाळा तालुका : २९११६० (३३३०००), न्यू फलटण शुगर : २८३४५७ (३०३२५०), जरंडेश्‍वर कोरेगाव : ९१०९३० (१०९८५७०), जयवंत शुगर : ६१४०१०(७९६६००), ग्रीन पॉवर शुगर : ६०००१४ (७०१८९०), स्वराज्य इंडिया ॲग्रो : ४९४०३३ (५०३४३५), शरयू शुगर : ८०४१०५ (९१७८५०).
(आकडेवारी महाशुगर.कॉमच्या सौजन्याने)

Web Title: sugar factory galap