शेतकरी संघटनेचे रयत-अथनी साखर कारखान्यासमोर आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

रयत अथनी शुगर या साखर कारखान्याने गळीत झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. बिल मिळावे यासाठी प्रशासन, साखर आयुक्त यांनाही अनेकदा निवेदने दिली. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करत आहोत.

कऱ्हाड : म्हासोली येथील रयत अथनी शुगर या साखर कारखान्याने गळीत 
झालेल्या उसाची बिले दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांची सोसायटी थकबाकीत गेली असुन शेतकऱ्यांना नाबार्ड व पंजाबराव देशमुख योजनेचा लाभ मिळणार नाही. त्याच्या निषेधार्थ व थकीत बिल मिळावे या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने रयत-अथनी साखर कारखान्यासमोर आज सकाळपासुन ठिय्या आंदोलन सुरु केले असुन बिल जमा केल्याशिवाय तेथुन उठणार नसल्याची माहिती संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष पंजाबराव पाटील यांनी दिली. 

रयत अथनी शुगर या साखर कारखान्याने गळीत झालेल्या उसाची बिले शेतकऱ्यांना दिलेली नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांवर मोठी आर्थिक कुऱ्हाड कोसळली आहे. बिल मिळावे यासाठी प्रशासन, साखर आयुक्त यांनाही अनेकदा निवेदने दिली. मात्र त्याची दखलच घेतली गेली नाही. त्याबद्दल आम्ही त्यांचाही निषेध करत आहोत.

शेतकऱ्यांचे ऊस बील द्यावे या मागणीसाठी आज कारखान्यासमोर बळीराजा शेतकरी संघटनेने केंद्रीय अध्यक्ष श्री. पाटील, जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला, सुनिल कोळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यापुढेही तीव्र आंदोल करणार असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Web Title: sugar factory in Karhad