Sugarcane Fire : 18 महिने पोटच्या पोराप्रमाणं सांभाळलेला ऊस स्वतःच्या हातानं पेटवून देण्याची शेतकऱ्यांवर वेळ

शिराळा तालुक्यात जवळपास चार कारखान्यांच्या (Sugar Factory) तोडी सुरू आहेत.
Sugarcane Fire in Shirala Sangli
Sugarcane Fire in Shirala Sangliesakal
Summary

कारखाना कर्मचाऱ्यांनाही तोडणी हंगाम ठरवताना मोठी कसरत करावी लागत असून त्रास सहन करावा लागत आहे.

पुनवत : सध्या ऊस गाळप हंगामाची (Sugarcane Crushing Season) अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरूआहे. आधीच ऊसदराच्या आंदोलनामुळे जवळपास एक महिना उशिरा सुरू झाला. त्यातच तोडणी मजुरांची कमतरता, परिणामी ऊस तोडणी लांबली. पाण्याअभावी आधीच चिपाडे झालेला ऊस शेतात शिल्लक राहू नये, म्हणून शेतकऱ्यांची धडपड करून १८ महिने पोटच्या पोराप्रमाणे सांभाळलेला ऊस आता स्वतःच्या हाताने पेटवून देण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.

शिराळा (Shirala) तालुक्यात गतवर्षीपेक्षा चालू हंगामात तिन्ही कारखान्यांकडे तोडणी मजुरांची संख्या कमी आहे. शिल्लक राहिलेला ऊस नोंदीप्रमाणे प्राधान्याने गाळपासाठी नेण्यासाठी कर्मचाऱ्यांची धावपळ सुरू आहे. मात्र, या लगबगीत ऊस उत्पादक भरडून निघाला आहे. बहुतांश ठिकाणी तोडणी मजुरांकडून अडवणूक, वैरण मिळत नसल्याने गावटोळ्याही बंद झाल्या आहेत. अधिकचे पैसे देऊनही तोडीणी मजूर तयार होत नसल्याने ऊस पेटविण्याचा पर्याय शेतकऱ्यांनी अवलंबला असल्याचे जाणकारांचे मत आहे.

Sugarcane Fire in Shirala Sangli
Kolhapuri Chappal : आता कोल्हापुरी चप्पलसाठी मिळाला 'QR कोड'; बनावट उत्पादनास बसणार चाप, मोबाईलने होणार चीप स्कॅन

शिराळा तालुक्यात जवळपास चार कारखान्यांच्या (Sugar Factory) तोडी सुरू आहेत. मात्र, तोडणी मजुरांच्या तुटवड्यामुळे वेळापत्रक कोलमडले आहे. चालू हंगामात अनेक टोळ्यांनी फसवले असल्याने टोळीतील कर्मचाऱ्यांना व मुकादमांवर दबाव टाकला, तर पुढच्या वर्षी येतील का नाही, या भीतीने दबाव टाकता येत नाही. वैरण मिळत नसल्याने गावटोळ्यांनीही पाठ फिरवली आहे. अद्यापही शिराळा तालुक्यात जवळपास २५ ते ३० टक्के ऊस अद्यापही शिल्लक आहे. वाढत्या उन्हाळ्यामुळे तोडणी मजुरांचे काम करणेही अवघड होत आहे. पहाटे व दुपारी तीननंतर तोडणी करावी लागत आहे.

Sugarcane Fire in Shirala Sangli
Loksabha Election : 'तुम्हाला अपेक्षित असलेली ब्रेकिंग न्यूज लवकरच मिळेल'; शाहू छत्रपती महाराजांचे सूचक संकेत

कारखाना कर्मचाऱ्यांनाही तोडणी हंगाम ठरवताना मोठी कसरत करावी लागत असून त्रास सहन करावा लागत आहे. तालुक्यात जवळपास चांगल्या उसाचे फड हंगामाच्या पहिल्या टप्प्यात संपले आहेत. शिल्लक राहिलेला तुरे आलेला व पाण्याअभावी वाळलेला ऊस आहे. परिणामी कारखाने बंद होताच शिराळा तालुक्यात पहिल्यांदाच ओल्या चाऱ्याचा प्रश्न बिकट होणार असूनही पर्याय नसल्याने वैरणीची पर्वा न करता ऊस पेटवण्याचा कठोर निर्णय शेतकरी घेत आहेत.

Sugarcane Fire in Shirala Sangli
Mahavitaran : थकबाकी वाढल्यामुळं भारनियमनाचं मोठं संकट; महावितरणकडून कारवाईचा बडगा, रत्नागिरीत 23 कोटी 88 लाख थकले

शेतकरी हतबल

सध्या तोडणी मजुरांकडून ऊस तोडण्यासाठी अव्वाच्या सव्वा मागणी होत असून एकरी ५ ते ७ हजार रुपये देऊनही नकार मिळत असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी नुकसान होणार आहे, हे माहिती असतानाही ऊस पेटवून त्याची तोडणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

जवळपास तीन एकर आडसाली ऊस आहे. ऊस तोडणीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र एक कांडेही तुटले नाही. अशीच परिस्थिती तडवळे परिसरात बहुतांश शेतकऱ्यांची झाली आहे. शेवटी उभा ऊस पेटवण्याची वेळ आली. परिणामी ऊस क्षेत्र कमी होईल.

-भगवान सिधू नांगरे, ऊस उत्पादक शेतकरी, तडवळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com