यंदा एकरकमी एफआरपी देणार 

सुनील पाटील : सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 31 ऑक्टोबर 2016

पालमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, यंदाच्या गळीत हंगामात एक रक्कमी एफआरपी देण्यासाठी कारखानदार तयार झाले आहेत. त्यामुळे शेतकरी आणि शेतकरी संघटनेचा विजय झाला आहे. दरम्यान खासदार राजू शेट्टी यांनी यावर्षी 3200 रुपयेच दर पाहिजे असा मुद्दा मांडला. पण, कारखानदारांनी हे शक्‍य नसल्याचे सांगितले. यासाठी शेट्टी यांनी एक पाऊल मागे आले पाहिजे. तसेच साखर कारखान्यांनी एक पाऊल पुढे आले पाहिजे. यातून शेतकऱ्यांना चांगला दर देता येईल. 

कोल्हापूर - यंदा होणारी एफ.आर.पी.ची एक रकमी दिली जाईल. त्यामुळे, 5 नोव्हेंबरला साखर कारखाने सुरू होण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, शेतकरी व विविध संघटनांनी एफआरपीपेक्षा जास्त दर देण्याबाबत केलेल्या मागणीबाबत शेतकरी संघटना आणि कारखानदार आपआपल्या मताशी ठाम राहिल्याने आणखी दोन ते तीन बैठक घ्यावी लागणार असल्याने आजच्या बैठक़ीत दराची कोंडी कायम राहिली आहे. याबाबत मंगळवारी (ता.1) दुसरी बैठक़ होण्याची शक्‍यता आहे. 

यंदाच्या गळीत हंगामात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने 3200 रुपये पहिला हप्त्याची मागणी केली आहे. याशिवाय, शिवसेना व शेतकरी कामगार पक्षाने पहिली उचल 3000 रुपये द्यावी अशही भूमिका घेतली आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि आढावा घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली प्रशासन, शेतकरी संघटना व कारखानदारांची आज शासकीय विश्रामगृहात आढावा बैठक झाली. यावेळ, स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, व कारखानदारांच्यात सुमारे दिड तास बैठक घेवून पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार राजू शेट्टी व हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

खासदार राजू शेट्टी म्हणाले, एफआरपीची रक्कम दिली म्हणजे काही उपकार केले नाहीत. ती तर कायद्यानेच द्यावी लागणार आहे. ज्यावेळी एक एप्रिल ते 31 मार्चला आर्थिक वर्ष संपल्यानंतर साखरेला 3200 पेक्षाही जास्त दर होता. हाता मार्चचा ताळेबंद दाखवून चालणार नाही. गेल्या हंगामातील 31 मार्चनंतर विक्री केलेल्या साखरेतील काही रक्कम यामध्ये घालून पहिली उचल 3200 रुपये देणे शक्‍य आहे. ज्या कारखान्यांचा साखर उतार 12 आणि कारखाना 150 दिवस चालणार आहे. अशा साखर कारखान्यांना 3200 रुपये देता येतो. यामध्ये काही कारखान्यांचा उतार कमी आणि कमी दिवस भरत असतील तर त्यात थोडा बदल होवू कतो. पण यंदा ती परिस्थिती नाही. त्यामुळे यंदा पहिली उचल 3200 रुपये असलीच पाहिजे यावर शेतकरी संघटना ठाम असल्याचेही श्री शेट्टी यांनी सांगितले. 

कोल्हापूर जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, वास्तविक उसाला जादा दर मिळाला पाहिजे. यासाठी एफआरपी कायदा आम्ही आणला म्हणून सांगत आहेत. आता याच एफआरपीनूसार साखर कारखाने दर देण्यास तयार असताना प्रत्येक वर्षी आंदोलन करतातच कशाला असा टोला खासदार राजू शेट्टी यांनी लगावला. कारखान्यांची परिस्थिती बिकट आहेत. यावेळी, आमदार सतेज पाटील, आमदार चंद्रदीप नरके, गणपतराव पाटील आदिसह जिल्ह्यातील कारखानदार उपस्थित होते. 
 
सदाभाऊ आमच्या सोबत हाईत न्हव : शेट्टी 

ऊस दराबाबत बैठक़ झाल्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला सदाभाऊ खोत हे सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे, शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते म्हणून नाहीत. अस स्पष्ट केले. पत्रकार परिषद संपल्यानंतर सदाभाऊ तुम्ही सरकारच्या बाजूने बोलला म्हणे असा टोला लगावून सदाभाऊ आमच्यासोबतच हाईत न्हव असा थेट पत्रकारांनाच सवाल केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. 

Web Title: sugar mill owners offer no raise in frp