

मिरज : आरग (ता. मिरज) येथील मोहनराव शिंदे साखर कारखाना येथून १३ लाख ४९ हजार ८४९ रुपये किमतीची ३१ टन साखर ट्रकमध्ये भरून घेत ती अपेक्षित ठिकाणी न पोहोचवता परस्पर त्याचा अपहार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रोहित राजशेखर सावळे (रा. लक्ष्मी मंदिरजवळ, सांगली) यांनी अशोक निळे (रा. व्हसपेठ, ता. जत), पैगंबर शेख (रा. मिरज) आणि सूरज सय्यद (रा. मिरज) यांच्याविरोधात मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. २४ ते २९ मार्च या कालावधीत हा प्रकार घडला.