

Sugarcane farmers spend the night on the roadside during the ongoing price protest at Kini.
esakal
विजय लोहार
नेर्ले,: शेतात राबायचे, घाम गाळायचा, ऊन-पावसाची तमा न बाळगता ऊस पिकवायचा आणि तोच ऊस कारखान्याला घातल्यानंतर आपल्या घामाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून रस्त्यावर उतरायचे... हीच का शेतकऱ्यांच्या नशिबाची कहाणी? मायबाप सरकार, आता तरी शेतकऱ्यांची थट्टा करू नका, अशी आर्त हाक किणी येथील ऊसदर आंदोलनातून उमटत आहे.