
सोलापूर : यंदाचा हंगाम सुरू झाल्यापासून गाळप केलेल्या उसासाठी सुरवातीचा किमान एफआरपी ऊसदर अदा करताना आधारभूत साखर उतारा म्हणून पुणे व नाशिक विभागासाठी १०.२५ टक्के साखर उतारा निश्चित झाला आहे. हा आधारभूत उतारा यंदाच्या गळीत हंगामासाठी व त्यापुढील हंगामाचा अंतिम साखर उतारा निश्चित होईपर्यंत लागू असणार आहे.