आता ताज्या उसाच्या रसाची Home Delivery

यापूर्वी शहरात विशिष्ट ठिकाणी उसाच्या रसाचा गाडा आढळून यायचा.
sangli
sangliesakal

इस्लामपूर : पिझ्झा, बर्गर प्रमाणे फोन नंबर लावताच मिळणार आता घरपोच ताज्या उसाचा रस अशी नामी शक्कल लढवत येथील रवी चव्हाण या तरुणाने फिरती उसाच्या रसाची गाडी बनवून संपूर्ण इस्लामपूर शहराला वेड लावले आहे. शहराच्या कानाकोपऱ्यात याचा रसाचा स्वाद नागरिकांच्या बरोबर घरातील कुटुंबीय सुद्धा सहज घेत आहेत. सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक दृष्ट्या परवडणारा उसाचा रस ठराविक ठिकाणी चौकात उपलब्ध होतो. परंतु नगरपालिकेने अतिक्रमणाचा हातोडा उचल्ल्याने रवी चव्हाण याने शक्कल लढवली. डिझेल इंजिन, जुन्या चारचाकी गाडीचा सांगाडा, ऊस गळपाचे यंत्र याचे जुगाड करून फिरता रसाचा गाडाच तयार केला. त्याच्यावर फोन नंबर लिहून संपूर्ण शहरात कानाकोपऱ्यात तो गाडा फिरवला.

यापूर्वी शहरात विशिष्ट ठिकाणी उसाच्या रसाचा गाडा आढळून यायचा. परंतु त्याचा स्वाद फक्त शहरात कामानिमित्त येणारे जाणारे नागरिक घेत होते. घरातून शक्यतो बाहेर न पडणाऱ्या नागरिकांना याचा आनंद घेता येत नव्हता. वृद्ध आजी-आजोबा, स्त्रिया, लहान मुले यांना उसाचा रस पिण्यास मिळत नसे. याचा विचार करून चव्हाण यांनी फिरता उसाचा गाडा तयार केला.तो शहरातील कानकोपऱ्यात फिरवला. सुरवातीस लोकांचा प्रतिसाद कमी होता. थंडीचे प्रमाण कमी होताच लोकांची मागणी वाढू लागली आहे. सकाळी आठ वाजले की ग्राहकांचे फोन यायला सुरवात होते. सायंकाळी सहा वाजेपर्यंत नागरिक फोन करत असतात. घरातील संपूर्ण कुटुंब उसाचा रस पिण्याचा आनंद घेतात.

sangli
ना मराठी, ना इंग्लिश तांत्रिक बिघाडाने पेपर आले वेगळ्याच भाषेत

रवींद्र चव्हाण यांचा सुरवातीस हातगाडा होता. त्यामुळे शहरात एकाच ठिकाणी थांबून ऊसच्या रसाची विक्री करीत होते. नुकताच नगरपालिकेचा अतिक्रमाणाचा हातोडा पडल्याने जगणे मुश्किल झाले. गाडा त्याठिकानाहून हलवण्यात आला. रवींद्र यांना त्यातच हा मार्ग सापडला. अडचणीवर मात करीत फिरता चाकी गाडा तयार केला. त्यात सर्व सुविधा केल्या. कमी त्रासात व्यवसाय सुरळीत सुरु केला आहे.

"सकाळी लवकर उठून शेतातील ऊस तोडून आणला जातो. ऊस स्वच्छ धून साफ करून गाड्यावर रचून ठेवला जातो. दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडतो. दिवसाकाठी तीन ते चार उपनगरात फेरी पूर्ण होते. असे संपूर्ण शहराचा फेरा आठवड्यात पूर्ण करीत आहे."

- रवींद्र चव्हाण, व्यवसायिक रसवंती गाडी

sangli
इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा निर्घृण खून, धारदार शस्त्राने वार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com