Raju Shetty Sugarcane rate Agitation
sakal
कोगनोळी - साखरेच्या किमान विक्री मूल्याच्या (MSP) मागणीसाठी महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमाभागात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या ऐतिहासिक आंदोलनाने आता नवे वळण घेतले आहे. सलग ३१ तास पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरल्यानंतर, प्रवाशांची होणारी कोंडी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी आपले महामार्गावरील ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. मात्र, हा लढा संपलेला नसून तो थेट केंद्रीय मंत्र्यांच्या दारात नेण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती राजू शेट्टी यांनी दिली.