

Sangli Farmer
sangli
नवेखेड: हुतात्मा साखर कारखान्याकडून ऊसदर जाहीर करण्यात होत असलेल्या विलंबाच्या निषेधार्थ स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आज नवेखेड-बोरगाव रस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरना अडवून टायरमधील हवा सोडण्यात आली. ‘ऊसदर जाहीर करा, अन्यथा ऊस थांबवा,’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.