पिकाला भाव नसल्याने चारा म्हणून उपयोग

राजकुमार शहा 
शनिवार, 14 जुलै 2018

गेल्या आठवड्यात पावसामुळे झेंडुची अवस्था फारच बिकट झाली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने दर सुधारतील.
- महावीर भोसले ( शेतकरी)

मोहोळ : पावसाने दडी मारल्याने वाया गेलेला खरीप हंगाम मुंबईतील पावसामुळे दर . नसलेला झेंडु माळरानावर टाकुन द्यायची आलेली वेळ दुधाला नसलेला दर व चाराटंचाई यामुळे शेतकरी अडचणीत सापडला असून, शेतात उभा असलेला ऊस कारखान्याला गाळपासाठी पाठविण्याऐवजी त्याचा आता हिरवा चारा म्हणुन उपयोग होऊ लागल्याने साखर कारखाने अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या खरीप हंगाम सुरू आहे. मात्र पेरणीयोग्य पाऊस नसल्याने तुर सोयाबीन उडीद या सह अन्य पिकाच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. मात्र, पावसाने आणखी ओढ दिली तर खरीप वाया जाणार आहे. विहीरीच्या पाणी पातळीत वाढ न झाल्याने उभ्या पिकाला पाणी देणे अडचणीचे झाले आहे. मुंबई येथे पाऊस असल्याने पावसाअगोदर पन्नास ते साठ रुपये प्रती किलो विकणारा झेंडु दर नसल्याने माळरानावर टाकुन देण्याची वाईट वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या वर्षी पाऊस चांगला झाल्याने ऊस पिक जोमात आहे. मात्र, चाराटंचाईमुळे त्याचा दुभत्या जनावरासाठी चारा म्हणुन उपयोग करावा लागत आहे. त्यामुळे कारखानेही अडचणीत येणार आहेत.

सध्या दुधाचे दर वाढण्याऐवजी कमी झाले आहेत. मात्र पशुखाद्याचे दर वाढीव आहेत. त्यामुळे दुधाचे पैसे व पशुखाद्याचे पैसे यांची बरोबरी होत असल्याने सध्या हरभरे खाल्ले हात कोरडे अशी शेतकऱ्यांची अवस्था झाली आहे. अनेक शेतकऱ्यांनी दुभती जणावरे विक्रीस काढली आहेत. कडब्याची पेंढी विस रुपयाला झाल्याने तीही वैरणीसाठी परवडेना या सर्व अडचणीमुळे शेतकऱ्यांचा कर्जाचा डोंगर वाढतच आहे.

गेल्या आठवड्यात पावसामुळे झेंडुची अवस्था फारच बिकट झाली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने दर सुधारतील.
- महावीर भोसले ( शेतकरी)

Web Title: sugarcane use for animal in Mohol