साखर उद्योगाला उसाची चिंता

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.

सोलापूर - देशात सर्वाधिक साखर कारखाने असलेला जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यापुढे यंदा अस्मानी संकट उभे राहिले आहे. यंदा गाळपासाठी असलेल्या एक लाख ४ हजार हेक्‍टर उसापैकी २० ते ३० टक्के ऊस जनावरांच्या छावण्यांसाठी वापरला गेला आहे. पाण्याअभावी उसाचे पाचट झाल्याने यंदाच्या गळीत हंगामात जिल्ह्यातील ३२ पैकी साधारणतः २२ कारखानेच सुरू होण्याची शक्‍यता आहे.

जुलै उजाडला, तरीही सोलापूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरविल्याने यंदाच्या हंगामात नवीन उसाची लागणही रखडली आहे. यंदा जिल्ह्यात २ हजार ३५६ हेक्‍टरवरच आडसाली उसाची लागण आतापर्यंत झाली आहे. त्यामुळे यंदाचा व पुढील गळीत हंगाम या संकटामुळे धोक्‍यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sugarcane worries for sugar industry