मिनाई आश्रमशाळेच्या प्रश्नांबाबत निलम गोऱ्हे यांना आयुक्तांना दिल्या सुचना

WhatsApp-Image-2018-10-08-a.jpg
WhatsApp-Image-2018-10-08-a.jpg

कुरळपला (जि.सांगली ) : येथील मिनाई आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक तसेच या शाळेची पाहणी करून ही या प्रश्नांकडे दुर्लक्ष केलेल्या तत्कालीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याच्या सूचना शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिल्या. तसेच मिनाई आश्रमशाळा ही दुसऱ्या संस्थेला लवकरच हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे संचालक विजाभज इमाव व विमाप्र कल्याण यांचे आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांना आश्वासन दिले

बुलडाणा येथील आश्रमशाळेत मुलींवर अत्याचार घडल्याची घटना सन २०१६ मध्ये उघडकीस आली होती. यानंतर वारंवार महाराष्ट्रात आश्रमशाळेत मुलींवर अत्याचारात वाढ होत असल्याचे निदर्शनास येत आहेत. २६ सप्टेंबरला कुरळप (जि. सांगली )येथील मिनाई आश्रमशाळेत संस्थापक अरविंद पवार यांनी शाळेतील अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी शिष्टमंडळासह समाज कल्याण आयुक्त मिलिंद शंभरकर, शरद अहिरे संचालक-भटक्या विमुक्त जाती जमाती इतर मागासवर्ग कल्याण (विजाभज इमाव व विमाप्र कल्याण), रुचेश जयवंशी- आयुक्त अपंग कल्याण, विजया पवार-सह संचालक, माधव वैद्य-सह आयुक्त शिक्षण, अनुराधा ओक-उपायुक्त शिक्षण, उमेश घुले-उपायुक्त आस्थापना, प्रभाकर परदेशी सहसंचालक विजाभज इमाव व विमाप्र कल्याण यांच्या समवेत समाज कल्याण आयुक्तालय येथे एकत्रित बैठक घेतली.

यावेळी आश्रमशाळेत मुली-मुलांवर होणारे अत्याचार हे रोखण्यासाठी करावयाच्या उपयायोजना यावर आ.डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करून काही सूचना दिल्या. यात आश्रमशाळेतील मुलीं मुलांनी काही तक्रार करावयची असेल तर तक्रार पेटी ठेवण्यात यावी व ही पेटी महिला वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या उपस्थित महिन्यातून दोनदा खुली करून कारवाई करण्यात यावी. याचबरोबर आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना अंतरदेशीय पोस्टाची पत्र देण्यात यावेत या पोस्टकार्डद्वारे तक्रार करू शकतील अशी सूचना आ.डॉ.गोऱ्हे यांनी दिली व ही सूचना मान्य समाज कल्याण आयुक्त यांनी मान्य केली व याबाबतच्या सूचना देखील आयुक्तांनी संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.

आश्रमशाळेतील मुलींवर झालेल्या अत्याचाराबाबत सन २००३-२००४ या काळातील विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहाची महिला तदर्थ समितीच्या शिफारसीची पुस्तिका आ.डॉ.गोऱ्हे यांनी समाज कल्याण आयुक्तांना दिले. यातील काही शिफारशीच्या अंमलबजावणी करण्याबाबत आ.डॉ.गोऱ्हे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. यात मुलींच्या स्वच्छतागृहाच्या सुरक्षितेबाबत सूचना दिल्या. तसेच प्रत्येक आश्रमाशाळेत महिला दक्षता समिती नेमण्यात यावी. त्याच बरोबर माजी शिक्षक किंवा माजी विद्यार्थी यांची कमिटी स्थापन करून आश्रमशाळांना अचानक भेटी देण्याची सूचना यावेळी त्यांनी केली. 

आश्रमशाळेत मुलींच्या सुरक्षितेबाबत Standard Operating Procedure तयार करण्याची सूचना समाज कल्याण आयुक्त यांनी मान्य केली. तसेच सांगली या केस मध्ये चार्जशीट तयार करताना कायदेशीर सल्ला घेऊन न्यायालयात सादर करण्यात यावी जेणेकरून आरोपींना यात पळ काढता येणार नाही. त्याच बरोबर विदयार्थी 'गुड टच' और 'बॅड टच' बाबत माहिती देण्यासाठी चाईल्ड समुपदेशन यांची मदत घेण्यात यावी, अशी सूचना आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. यावेळी शिवसेना उपशहरप्रमुख आनंद गोयल, सचिन खांदवे, धनंजय जाधव उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com