पोलिस कोडठीतील आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 16 January 2020

आलीकडेच संशियीत आरोपीने तुंगत गावातील एका मतीमंद महिलेवर अत्याचार केला होता. या  प्रकरणी आरोपी तो पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील जेल मध्ये होता.

पंढरपूर : पंढरपूर तालुका पोलिस ठाण्याच्या लाॅकअपमध्ये ठेवण्यात आलेल्या तुंगत येथील आरोपीने आज पहाटे गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. अर्जून दिगंबर शितोळे अस आत्महत्या करणार्या संशयित आरोपीचे नाव आहे. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आरोपीची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा - लाचेची रक्कम कमी करण्यास नकार! पहिला हप्ता म्हणून घेतले..

आलीकडेच संशियीत आरोपीने तुंगत गावातील एका मतीमंद महिलेवर अत्याचार केला होता. या  प्रकरणी आरोपी तो पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यातील जेलमध्ये होता. दरम्यान आज पहाटे आरोपी शितोळे याने कोडठीतच गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तात्काळ त्याला पंढरपुरातील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा -  अश्‍लील इमोजीमुळे अडकला फेसबुक फ्रेंड!

सध्या त्याची प्रकृती गंभीर आहे. घटनेनंतर जिल्हा पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी सागर कवडे यांनी रूग्णालयाला भेट देऊन आरोपीच्या प्रकृतीची चौकशी केली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide attempt by strangulation