कोल्हापूरः चांदी कारागिराची उत्तूरमध्ये आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 जुलै 2019

  • तळगाव (ता. राधानगरी) येथील सुदर्शन शिवाजी पाटील (वय 22) या युवकाने विषारी द्रव पिऊन येथील समाज मंदिरात आत्महत्या
  • विश्वास एकनाथ पाटील यांची पोलिसांत फिर्याद.
  • आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

उत्तूर - तळगाव (ता. राधानगरी) येथील सुदर्शन शिवाजी पाटील (वय 22) या युवकाने विषारी द्रव पिऊन येथील समाज मंदिरात आत्महत्या केली. याबाबात विश्वास एकनाथ पाटील याने पोलिसांत फिर्याद दाखल केली. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. 

सुदर्शन 3 जुलैला घरातून कामावर जातो असे सांगून निघून गेला होता. तो कोल्हापुरात चांदी काम करत होता. त्याच्या विचित्र वागण्याने घरच्यांनी त्याचा मोबाईल काढून घेतला होता. रविवारी त्याने गडहिंग्लज येथे जावून चांदीचे ब्रेसलेट खरेदी केले होते. त्याची पावती त्याच्या खिशात सापडली. यानंतर तो उत्तूर गावात फिरत होता. रात्री त्याने समाजमंदिरात मुक्काम केला.

आज पहाटे सहाच्या दरम्यान चांदी कामासाठी वापरात येणारा द्रव त्याने पिले. थोड्याच वेळात तो गतप्राण झाला. समाजमंदिरात वाचनालयात पहाटे वृतपत्र वाचण्यासाठी आलेल्या नागरिकांना सुदर्शन मृतावस्थेत आढळला. पोलिसांनी घटनास्थळी येवून पाहणी केली. कागदपत्रावरून पोलिसांनी नातेवाईकासी संपर्क साधला. नातेवाईक आल्यावर ओळख पटल्यानंतर दुपारी आजरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केले. पुढील तपास सहाय्यक फौजदार पांडूरंग दोरुगडे करीत आहेत. 

आत्महत्येचे गुढ 
राधानगरी ते उत्तूर अंतर 80 किलोमीटर आहे. एवढ्या दूर येऊन सुदर्शनने आत्महत्या करण्याचे कारण काय ? नेमके कुठल्या कारणासाठी त्याने आत्महत्या केली याचा शोध पोलीस घेत आहेत. 
 

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Suicide incidence in Uttur Kolhapur District