esakal | अकरा महिन्याच्या चिमुरडीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

बेळगाव :अकरा महिन्याच्या चिमुरडीसह आईची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
अमृत वेताळ

बेळगाव : केवळ अकरा महिन्याच्या चिमुरडीसह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना मनीकेरी (ता. बेळगाव) येथे रविवार (ता. ५) सकाळी घडली आहे. कल्पना मोहन गुडाजी (वय २१) आणि भूमिका (वय ११ महीने) अशी मृत मायलेकीची नावे आहेत. या घटनेची नोंद काकती पोलीस स्थानकात झाली आहे.

हेही वाचा: वाहतूक नियमांचे उल्लंघन सांगलीकरांना पडले ७८ लाखांना

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बिरनोळी येथील कल्पना हिचा विवाह गेल्या दोन वर्षापूर्वी मनीकेरी येथील मोहन याच्याबरोबर झाला होता. त्यांना अकरा वर्षांची एक मुलगी देखील होती. पती मोहन हा कृषी उत्पन्न बाजार समितीत (एपीएमसी) हमाली काम करतो. आज सकाळी अकराच्या सुमारास कल्पना ही आपल्या अकरा महिन्याच्या बालिकेला सोबत घेऊन कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडली होती. त्‍यानंतर तिने गावापासून काही अंतरावर असलेल्या सार्वजनिक विहिरीत मुलीसह स्वतः उडी घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा: बेळगाव : महानगरपालिकेच्या मतमोजणीसाठी वाहतूक मार्गात बदल

कल्पना हिचे गावातच नातेवाईक आहेत. त्यामुळे ती त्यांच्याकडे गेली असावी, या शक्यतेने सासरची मंडळी देखील गप्प होती. मात्र गावातील सार्वजनिक विहिरी एका महिलेने मुलीसह आत्महत्या केल्याची बातमी गावात पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काहीनी ही माहिती पोलिसांना दिली. बेळगाव ग्रामीणचे सहाय्यक पोलीस आयुक्त गणपती गुडाजी, काकतीचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश यरगोप्प व त्यांच्या सहकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने दोन्ही मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले. या घटनेबाबत कोणताही संशय असल्याची फिर्याद कुटुंबीयांनी दिल्याने पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा रुग्णालयातील जिल्हा रुग्णालयातील शवागृहात हलविले. त्यानंतर शल्य चिकित्सा करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

loading image
go to top